मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Vienna terror attack: ऑस्ट्रियात यहुदी मंदिरासह 6 जागांवर गोळीबार, हल्लेखोरासह एकाचा मृत्यू

Vienna terror attack: ऑस्ट्रियात यहुदी मंदिरासह 6 जागांवर गोळीबार, हल्लेखोरासह एकाचा मृत्यू

Vienna terror attack: व्हिएन्ना पोलिसांनी ट्वीट केले आहे की गोळीबाराची घटना रात्री आठ वाजता घडली ज्यामध्ये अनेक गोळ्या झाडल्या गेल्या.

  • Published by:  Priyanka Gawde

व्हिएन्ना, 03 नोव्हेंबर : युरोपियन देश ऑस्ट्रियाच्या (Austria) व्हिएन्ना शहरात (Vienna terror attack) दहशतवादी हल्ल्या झाला. येथील यहुदी मंदिरासह 6 वेगवेगळ्या ठिकाणी सशस्त्र लोकांनी गोळीबार केला. सीएनएनच्या म्हणण्यानुसार ऑस्ट्रियाचे सरकार हा नियोजित दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितले आहे. या दहशतवादी घटनेत आतापर्यंत हल्लेखोरांसह एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. मात्र सूत्रांनी 7 जणांच्या मृत्यूची नोंद केली आहे. व्हिएन्ना पोलीस विभागाच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यात बरेच लोक जखमी झाले आहेत आणि अद्याप मदतकार्य चालू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका दहशतवाद्याचा शोध सुरू आहे. या घटनेचे व्हिडीओही समोर आले आहे.

व्हिएन्ना पोलिसांनी ट्वीट केले आहे की गोळीबाराची घटना रात्री आठ वाजता घडली ज्यामध्ये अनेक गोळ्या झाडल्या गेल्या. ट्वीटमध्ये पुढे असेही सांगितले गेले आहे की अनेकांनी संशयितांना आधुनिक रायफल्ससह पाहिले. गोळीबारची घटना शहरातील 6 वेगवेगळ्या ठिकाणी घडली. या घटनेत एका अधिकाऱ्यासह बरेच लोक जखमी झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे.

एकाला मारण्यात यश

याव्यतिरिक्त, पोलीसांमी एका संशयित हल्लेखोराला गोळ्या घालून ठार केले आहे. पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की, या हल्ल्याची दखल घेऊन लोकांनी घरातच राहावे. अफवांपासून दूर राहावे. तसेच सार्वजनिक ठिकाणांपासून दूर रहा, असे सांगितले आहे.

निजोजित हल्ला

ऑस्ट्रियाचे चांसलर सेबॅस्टियन क्राऊसे यांनी याला नियोजित दहशतवादी हल्ला म्हटले आहे. ते म्हणाले, ते पूर्ण तयारीसह आले होते, त्यांच्याकडे स्वयंचलित शस्त्रे होती. त्यांना प्रशिक्षणही दिले होते. दरम्यान, सशस्त्र संशयितांपैकी एक सभास्थानातून बाहेर पडताना दिसला. हल्लेखोरांनी पळून जाण्यापूर्वी गोळीबारही केला. ऑस्ट्रियाचे आंतरिक व्यवहार मंत्री कार्ल नेहमेर यांनी सांगितले की मध्य व्हिएन्नामधील एका प्रमुख सभास्थानाजवळ झालेला गोळीबार हा दहशतवादी हल्ल्यासारखा दिसत होता.

First published:

Tags: Terror attack