Home /News /videsh /

बैरूदसारख्या स्फोटानं हादरलं जॉर्डन, आकाशात दिसले आगीचे गोळे, पाहा VIDEO

बैरूदसारख्या स्फोटानं हादरलं जॉर्डन, आकाशात दिसले आगीचे गोळे, पाहा VIDEO

स्फोट इतका भयंकर होता की घरांच्या काचा आणि दरवाजे तुटले अनेक घरांची छप्परंही उडाली.

    अम्मान, 11 सप्टेंबर : बैरूतमध्ये महिन्याभरापूर्वी झालेल्या स्फोटानंतर गुरुवारी पुन्हा आग लागली आणि तशीच प्रकारे आग शुक्रवारी पहाटे जॉर्डनमध्ये भडकली. जॉर्डनची राजधानी अम्मान इथे भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटोची तुलना बैरूद स्फोटाशी केली जात आहे. हा स्फोट भयंकर होता. परिसरात आगीचे लोळ आणि धुराचं साम्राज्य पसरलं होतं. स्फोट इतका भयंकर होता की घरांच्या काचा आणि दरवाजे तुटले अनेक घरांची छप्परंही उडाली. रॉयटर्स वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार लष्कराच्या शास्रसाठ्यात स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या गोदामात शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. हे वाचा-स्फोटांनी हादरल्यानंतर आता बैरूत पुन्हा संकटात! आगीच्या भीषण तांडवचा VIDEO VIRAL हे वाचा-लॉकडाऊनमध्ये कबाब खाण्याची आली हुक्की! महिलेला द्यावे लागले सव्वा लाख या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा स्फोट इतका भीषण होता की त्यानंतर हवेत आगीचा गोळा तयार झाल्याचं या फोटोंमध्ये दिसत आहे. या स्फोटात कोणती जीवितहानी झाली की नाही हे अद्याप समोर आलं नाही मात्र वस्तू, घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर गोदाम जळून खाक झालं आहे. महिन्याभरापूर्वी भीषण स्फोटांनी हादरलेल्या आणि उद्धवस्त झालेल्या बैरूत (Beirut blast)शहरात पुन्हा आज आगीचं तांडव सुरू आहे. प्रचंड मोठी आग भडकल्याचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लेबननची (Lebanon) राजधानी बैरूतमध्ये पुन्हा एकदा धडकी भरवणारी आग गुरुवारी लागली होती.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Video viral, Video Viral On Social Media

    पुढील बातम्या