VIDEO: ...आणि जेव्हा ATM बाहेर 77 वर्षीय आजोबा आणि चोरामध्ये रंगली WWF

VIDEO: ...आणि जेव्हा ATM बाहेर 77 वर्षीय आजोबा आणि चोरामध्ये रंगली WWF

आजोबा जोमात चोर कोमात, चोर आणि 77 वर्षीय वृद्ध आजोबांच्या फायटिंगचा VIDEO VIRAL

  • Share this:

मुंबई, 20 फेब्रुवारी : रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या भुरट्या चोरांचा सुळसुळाट भारतातच नाही तर भारताबाहेरही आहे. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 77 वर्षांच्या आजोबांनी एटीएममधून पैसे काढल्यानंतर त्यांना लुटण्यासाठी आलेल्या चोरासोबत त्यांनी दोन हात करत चोराला पळता भुई थोडी केली आहे. या 77 वर्षांच्या वृद्ध आजोबांनी चोराला चांगलाच इंगा दाखवला आणि चोराला हुसकवून लावलं. वृद्ध असल्याचा फायदा घेऊन हा चोर त्यांना लुटण्यासाठी आला होता खरा मात्र त्याच चोरावर पळून जाण्याची वेळ आली आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सोशल मीडियावर युझर्सकडून या 77 वर्षीय आजोबांचं कौतुक होत आहे.

हेही वाचा-फटाक्यांमुळे स्टेजवर गायकाच्या केसाला लागली आग, पुढे काय झालं पाहा VIDEO

इंग्लंडमध्ये रात्रीच्या वेळी 77 वर्षांचे वृद्ध आजोबा एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आले होते. पैसे काढून निघत असताना त्यांना चोरानं अडवलं. त्यांचे पैसे काढून घेण्यासाठी प्रयत्न करू लागला मात्र अजोबांच्या जुडो आणि तुफान मारहाणीसमोर चोराचा टिकाव काही लागू शकला नाही. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिलं आहे. तर 1.2 हजार लोकांनी या व्हिडिओवर फेसबुकला रिअॅक्ट केलं आहे. 600 हून अधिक लोकांनी या व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत. 77 वर्षांच्या या वृद्ध आजोबांच्या धाडसाचं कौतुक कराल तेवढं थोडं आहे. न डगमगता त्यांनी चोराला पळवून लावलं.

हेही वाचा-बॉस असावा तर असा! कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत CEO नी केला डान्स, पाहा VIDEO

हेही वाचा-Video: अ‍ॅनिव्हर्सरीला बनवला 'मृतदेहाचा केक', चाकूने कापून लोकांमध्येही वाटला

First published: February 20, 2020, 1:48 PM IST

ताज्या बातम्या