बैरुतनंतर चीनमधून आला धक्कादायक स्फोटाचा VIDEO; आकाशात दिसले धुराचे लोट

बैरुतनंतर चीनमधून आला धक्कादायक स्फोटाचा VIDEO; आकाशात दिसले धुराचे लोट

बैरुतमध्ये झालेल्या स्फोटात हजारो नागरिकांनी वाताहत झाली आहे

  • Share this:

शांडोंग, 15 ऑगस्ट : चीन (China) मधील शांडोंग प्रांतात बैरुतसारखा भयंकर स्फोट झाला आहे. चिनी मीडियाच्या रिपोर्टनुसार हा स्फोट (Blast) चीनच्या पूर्वेकडील शांडोंग प्रांतातील एक बाजाराजवळ झाले आहे. या स्फोटामुळे कित्येक लोकांवर परिणाम झाला आहे, याची अद्याप माहिती मिळालेली नाही.

स्‍फोटानंतर आकाशात धुराचे लोट दिसत होते. स्फोटानंतर अनेक घरांचे छप्पर उडाले आणि घरांच्या खिडकीच्या काच्या तुटल्या. ग्‍लोबल टाइम्‍सच्या रिपोर्टनुसार आतापर्यंत यामध्ये कोणाच्या मृत्यू माहिती समोर आलेली नाही. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू असून जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.  सुरुवातीच्या तपासानुसार शेतकऱ्यांच्या सामान ठेवण्याच्या जागेवर हा स्फोट झाला.

सांगितले जात आहे की लाकूड कापत असताना विजेच्या तारांना धक्का बसला आणि आग लागलू. यामुळे मोठा स्फोट झाला. यापूर्वी लेबनानची राजधानी बेरुतमध्ये भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात आतापर्यंत 178 लोकांचा मृत्यू झाला आहे. बैरुत पोर्टवर वेअर हाऊसमध्ये 6 वर्षांपासून 2750 टन अमोनियम नायट्रेट ठेवले होते. या अमोनियम नायट्रेटचा वापर खत बनविण्यासाठी करण्यात येणार होतं. या घटनेनंतर बैरुत शहरात मोठा गदारोळ झाला होता. या स्फोटाचा परिणाम इतका होता की 1.5 किमी लांबपर्यंत धुराचे लोट पाहायला मिळाले. सांगितले जात आहे की असे दोन स्फोट येथे झाले. ज्यामधील एक स्फोट पोर्ट भागात आणि दुसरा शहरात झाला. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार लेबनानमधील झालेल्या स्फोटात 5 भारतीय जखमी झाले आहेत.

Published by: Meenal Gangurde
First published: August 15, 2020, 5:25 PM IST
Tags: blast

ताज्या बातम्या