S M L

...जेव्हा व्हेल उडी घेते, पाहा दुर्मिळ व्हिडिओ

एखादी हम्पबॅक व्हेल हवेत कसरती करत असताना शूट झालेला हा जगातला पहिला व्हिडिओ आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Jul 25, 2017 07:43 PM IST

...जेव्हा व्हेल उडी घेते, पाहा दुर्मिळ व्हिडिओ

25 जुलै : सध्या 40 टन वजनाच्या हम्पबॅक व्हेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओमधली व्हेल हवेत वेगवेगळ्या कसरती करताना दिसते.

एखाद्या हम्पबॅक व्हेलचं वजन 36,000 किलोच्या आसपास असतं. अशी एखादी व्हेल समुद्रात कलाबाजी करताना दिसणं हे अत्यंत दुर्मिळ दृश्य आहे. काही सूत्रांनुसार एखादी हम्पबॅक व्हेल हवेत कसरती करत असताना शूट झालेला हा जगातला पहिला व्हिडिओ आहे. क्रेग कपहार्ट नावाच्या एका स्कुबा डायव्हरने हा व्हिडिओ शूट करून युट्यूबवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेच्या बोटे तटावर शूट करण्यात आला आहे.

चला तर हा ऐतिहासिक व्हिडिओ पाहूया.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 25, 2017 07:43 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close