नासाचा पृथ्वीच्या पृष्ठभागाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पृथ्वीचं दुसरं नाव आहे वसुंधरा. हिरवाईने नटलेल्या या वसुंधरेच्या म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागात अनेक बदल झालेत. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानं गेल्या 20 वर्षात पृथ्वीच्या पृष्ठभागात झालेल्या बदलांचा वेध घेणारा एक व्हिडीओ तयार केला

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Nov 22, 2017 09:22 AM IST

नासाचा पृथ्वीच्या पृष्ठभागाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

22 नोव्हेंबर:  पृथ्वीच्या पृष्ठभागावर गेल्या 20 वर्षात झालेल्या बदलांचा व्हिडीओ नासानं तयार केलाय. पृथ्वीच्या बदलत्या छटा आणि पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठीच्या या व्हिडीयोला सोशल मीडियावरही जोरदार प्रतिसाद मिळतोय.

 

पृथ्वीचं दुसरं नाव आहे वसुंधरा. हिरवाईने नटलेल्या या वसुंधरेच्या म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागात अनेक बदल झालेत. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानं गेल्या 20 वर्षात पृथ्वीच्या पृष्ठभागात झालेल्या बदलांचा वेध घेणारा एक व्हिडीओ तयार केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

1970 पासून नासाने सोडलेले उपग्रह पृथ्विच्या पृष्ठभागाचा आणि वातावरणाचा अभ्यास करत आहेत. या फोटो आणि व्हिडीओंमधून  धक्कादायक माहिती तर मिळते आहेच,त्याच बरोबर अभिनव गोष्टीही बाहेर आल्या आहेत. वसंत ऋतूत उत्तर गोलार्धात झाडांना नवी पालवी फुटते आणि निसर्ग बहरून येतो. त्याकाळात या भागात हिरवाई बहरते.

समुद्राच्या तळाशी सूर्य किरणं जेव्हा पोहोचतात. तेव्हा अनेक सुक्ष्म वनस्पती नव्याने खुलतात आणि कार्बन शोषून घेणारे सुक्ष्म जीव तयार होतात. १९९७ मध्ये नासानं सोडलेल्या सी व्ह्य़ूईंग वाइड फिल्ड ऑफ व्ह्य़ू या उपग्रहानं निसर्गचक्राचा हा बदलही टिपलाय.

Loading...

उन्हं, पाऊस आणि वारा, सागराचे प्रवाह यामुळं  निसर्ग दररोज आपल्या छटा बदलतोय. पृथ्वी दररोज नवा श्वास घेते आहे. पण गेल्या काही वर्षात निसर्गात होणारे बदल शास्त्रज्ञांना चिंता करायला लावणारे आहेत.

वाढत्या प्रदुषणामुळं पृथ्वीचं तापमान वाढतंय. त्याचे गंभीर परिणाम सध्या जगभर दिसून येताहेत पुढच्या पिढ्यांसाठी एक चांगली पृथ्वी ठेवायची असेल तर निसर्गालाही आपल्यालाला प्राणपणानं जापावं लागणार असल्याचा संदेशच शास्ज्ञांनी या व्हिडीओमधून दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 22, 2017 09:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...