Corona virus: 'दोन दिवसांपासून बहिणीच्या मृतदेहासोबत घरात आहे, काय करावं कळेना'

Corona virus: 'दोन दिवसांपासून बहिणीच्या मृतदेहासोबत घरात आहे, काय करावं कळेना'

सोशल मीडियावर एक मन हेलावून टाकणारा भाऊ आणि बहिणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 मार्च : कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. अनेक देशात कोरोना व्हायरसमुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर एक मन हेलावून टाकणारा भाऊ आणि बहिणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे बहिणीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर या भावाने केलेलं आवाहन ऐकून अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला.

इटलीमध्ये कोरोना व्हायरसने भयानक रूपधारण केलं आहे. मिळालेल्या वृतानुसार, शुक्रवारपर्यंत कोरोनामुळे 250 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मृतांचा आकडा हा 1200 वर पोहोचला आहे.

कोरोना व्हायरसमुळे इटलीत जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच लूका फ्रेंजी नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. लूका फ्रेंजीच्या बहिणीला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर बहिणीचा मृतदेह हा घरातच होता. गेल्या दोन दिवसांपासून बहिणीच्या मृतदेहासोबत राहत आहे. त्याने सोशल मीडियावर आवाहन केलं आहे की, "माझ्या बहिणीचा मृत्यू झाला आहे. मला समजत नाही की, मी काय करावं. मी तिच्यावर अंत्यसंस्कार सुद्धा करू शकत नाही कारण मला एकटं सोडण्यात आलं आहे."

या व्हिडिओमध्ये त्याच्या बहिणीचा मृतदेह दिसत आहे. अशी माहिती मिळतेय की, प्रशासनाने लूकाच्या कुटुंबाला निगराणीखाली ठेवलं आहे. त्याच्या बहिणीला कोरोना व्हायरसची बाधा झाल्यामुळे कुटुंबातील इतरही सदस्यांनाही याची बाधा झाली असेल. हा प्रकार समोर आल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितलं की, लूकाच्या बहिणीवर अंत्यसंस्कार करण्यात मदत करण्यात आली आहे.

दरम्यान, चीनपासून सुरू झालेला कोरोना व्हायरस आता युरोपमध्ये पोहोचला आहे. युरोपमधील अनेक देशांमध्ये या व्हायरसने धुमाकूळ घातला असून इटलीतील स्थिती तर दिवसेंदिवस खराबच होत चालली आहे. या रोगामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही इटली मोठ्या प्रमाणात आहे.

ब्राझील, कॅनडा आणि अमेरिका असे अनेक देशांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी स्वत:ला घरातच कोंडून घेतलं आहे. याबाबत त्यांच्या कार्यालयातून माहिती देण्यात आली आहे. ट्रुडो यांच्या पत्नीने काही दिवसांपूर्वी ब्रिटनमधील एका कार्यक्रमात भाषण केलं होतं. त्यानंतरच त्यांना कोरोनाची काही प्राथमिक लक्षणे आढळून आली होती.

ब्राझील सरकारचा जो अधिकारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटून गेला होता, तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं चाचणीतून समोर आलं आहे. याबाबत ब्राझीलमधील 'एस्ताडो दे साओ पाउलो' या वर्तमानपत्राने वृत्त दिलं आहे. मात्र असं असलं तरीही मी कोरोनाच्या लागण होण्याबाबत चिंतित नाही, असं ट्रम्प म्हणाले आहेत. तसंच मागील गुरुवारी ब्राझीलचे राष्ट्रपती बोल्सेनारो यांच्यासोबत भोजन केल्यानंतर कोरोनाची लागण होण्याची कोणतीही भीती नाही, कारण त्यांनी काहीही असामान्य केलं नाही, असंही ट्रम्प म्हणाले.

First published: March 14, 2020, 9:39 PM IST

ताज्या बातम्या