Home /News /videsh /

VIDEO : पत्रकार परिषदेत न्यूझीलँडच्या पंतप्रधानांना सेक्सबद्दल विचारला सवाल; हसत हसत दिलं उत्तर

VIDEO : पत्रकार परिषदेत न्यूझीलँडच्या पंतप्रधानांना सेक्सबद्दल विचारला सवाल; हसत हसत दिलं उत्तर

प्रश्न विचारत असताना त्यांचे हावभाव बदलत होते. मात्र शेवटी त्या म्हणाल्या..

    न्यूझीलँड, 10 सप्टेंबर : जगभरातील नागरिकांना कोरोनाशी (Coronavirus) सामना करावा लागत आहे. अशात न्यूझीलँडच्या (New Zealand) पंतप्रधान जेसिका अर्डर्नने (PM Jacinda Ardern) या महासाथीला ज्या पद्धतीने डील केलं, त्यांच्या प्रशासनाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. नुकतच त्यांनी कोरोनाबाबत एक पत्रकार परिषद घेतली होती. येथे विचारण्यात आलेल्या एका प्रश्नानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. या प्रश्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिपोर्टरने विचारला हा सवाल.. न्यूझीलँडच्या पंतप्रधान जेसिंका आणि डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ एश्ले ब्लूमफिल्ड कोविड-१९ बाबत पत्रकार परिषद घेत होते. यादरम्यान एका रिपोर्टरने त्यांना विचारलं की, ऑकलँड रुग्णालयात एक रुग्ण आणि त्यांना भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तीवर लैंगिक संबंध (sexual relations) ठेवण्याचा आरोप आहे. सद्यपरिस्थितीत याला हाय-रिस्क कृत्य मानलं जाऊ शकतं का? (VIDEO New Zealand PM asked about sex at press conference she replied with a smile) पंतप्रधानांचे हावभाव होतायेत व्हायरल हे ही वाचा-1 तास कमी काम करण्याची सवलत देण्यास नकार, महिलेने असं काही केलं की मिळाले 2 कोटी हा सवाल ऐकल्यानंतर जेसिंडाच्या हावभावमध्ये बदल पाहायला मिळत आहे. डॉक्टर ब्लूमफिल्डने या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की, मला वाटतं की, हा खूप हाय-रिस्क कृत्य होऊ शकतं. तरी मला या घटनेबाबत फारशी माहिती नाही. यानंतर पंतप्रधान उत्तर देताना म्हणाल्या की, मला वाटतं की, कोरोनाची परिस्थिती बाजूला ठेवली तरी असं कोणतंही कृत्य रुग्णालयात Visiting काळात होऊ नये. यासाठीदेखील न्यूझीलँड सरकार चर्चेत ऑकलँड जिल्हा स्वास्थ बोर्डाला बरीच टीकेचा सामना करावा लागत आहे. कारण बोर्डाने शेकडो लोकांना रुग्णालयात येऊन रुग्णांना पाहण्याची परवानगी दिली होती. मात्र शहरात कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Coronavirus, New zealand

    पुढील बातम्या