जेव्हा एक भारतीय अमेरिकन कुलगुरूंच्या पाया पडतो...

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 24, 2017 11:57 AM IST

जेव्हा एक भारतीय अमेरिकन कुलगुरूंच्या पाया पडतो...

24 मे : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ भलताच व्हायरल होतोय. हा व्हिडिओ आहे अमेरिकेतला. अमेरिकेत एका विद्यापीठात विद्यार्थांना पदवी प्रदान करण्याचा सोहळा चालू होता. त्यातच एक भारतीय विद्यार्थी आपली ग्रॅजुएशनची डिग्री स्वीकारताना कुलगुरूंच्या पाया पडला. त्या कुलगुरूंसाठी मात्र हा सगळा प्रकार नवीनच असावा. म्हणूनच पाया पडल्यानंतर ते गोंधळलेले कुलगुरू काही काळासाठी त्या  विद्यार्थाकडे स्मितहास्य करत पाहतच राहिले. आणि आता तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.

Loading...

अनेकांना  बॉलिवूड सिनेमांतील परदेशात जावूनही संस्कार न विसरलेली विविध पात्रं आठवू लागलीत.

'पाया पडणे' ही तशी आपल्याकडे सामान्य गोष्ट... कारण भारतात संस्कारांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच एखाद्या व्यक्तीच्या पाया पडून त्याच्याबद्दलचा आदर व्यक्त करण्याचीही आपल्याकडे पध्दत आहे. पण हेच जेव्हा अमेरिकेत घडतं तेव्हा मात्र तेथील लोक काहीसे गोंधळून जातात, असंच या सर्व प्रकरणानंतर म्हणावं लागेल.

ट्विटरवर या व्हिडिओला 11,000 लाइक्स मिळाल्यात शिवाय तेवढ्याच लोकांनी हा व्हिडिओ रीट्विट देखील केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2017 11:57 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...