इस्लामाबाद, 10 डिसेंबर : पाकिस्तानातील (Pakistan News) बहावलपूरमध्ये एका कॉलेजमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी (Vulgar Dance) डान्स करीत होते, आणि यावेळी कॉलेजचे प्राचार्यदेखील सामील झाले. यावेळी प्राचार्य विद्यार्थिनींवर नोटा उडवू लागले. यानंतर अन्य कर्मचारीदेखील डान्समध्ये सामील झाले.
कॉलेजच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसोबत अश्लील नृत्य करीत असल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. पाकिस्तानातील बहावलपूरचे उपायुक्तांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत.
पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या बातमीनुसार, कॉलेजमधील कार्यक्रमादरम्यान कथित अश्लील नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आदेश जारी करण्यात आले आहेत. पोलिसांनी बुधवारी हसिलपूरजवळील एका खासगी कॉलेजचे प्राचार्य, काही कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसह 40 जणांविरोधात अश्लील कृत्यांमध्ये सामील होण्याचा आरोप केला आहे. याशिवाय कॉलेजदेखील सील करण्यात आलं आहे.
व्हिडीओ क्लीपमध्ये कॉलेजच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी-विद्यार्थिनी स्टेजवर डान्स करीत होते.
National college hasilpur city district bahawalpur pic.twitter.com/lPWpuYlsXF
— Shahbazsaleem (@Shahbaz70542253) December 8, 2021
यानंतर कॉलेजचे प्राचार्य आणि अन्य कर्मचारीदेखील त्यांच्यासोबत डान्स करू लागले. यावेळी प्राचार्य नोटा उधळत होते.
— Shahbazsaleem (@Shahbaz70542253) December 8, 2021
अश्लील कार्यक्रमाच्या तपासासाठी समितीच गठन
या प्रकरणात चौकशीसाठी एका समितीचं गठण करण्यात आहे. ज्या ठिकाणी शिक्षण दिलं जातं, तेथे अशा प्रकारचं कृत्य करणं चुकीचं आहे, अशी प्रतिक्रिया येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pakisatan, Shocking viral video