Home /News /videsh /

अमेरिकेतील त्या कायद्याविरोधात बेट्टे मिडलरची महिलांना SEX strike ची हाक, पहा काय आहे प्रकरण

अमेरिकेतील त्या कायद्याविरोधात बेट्टे मिडलरची महिलांना SEX strike ची हाक, पहा काय आहे प्रकरण

ख्रिश्चन धर्मात गर्भपात करणे हे पाप मानले जाते आणि त्या आधारे टेक्सास प्रशासनाने गर्भपाताविरोधात कडक कायदा केल्यामुळे महिलांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

    वॉशिंग्टन,05 सप्टेंबर : अमेरिकेतील टेक्सास या प्रांतात तयार करण्यात आलेल्या एका नव्या कायद्यामुळं महिलांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून अनेक महिला या कायद्याविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. ख्रिश्चन धर्मात गर्भपात करणे, हे पाप मानले जाते आणि त्या आधारे टेक्सास प्रशासनाने गर्भपाताविरोधात कडक कायदा केल्यामुळे महिलांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. 1 सप्टेंबरपासून हा कायदा अंमलात आला आहे. गायिका आणि अभिनेत्री बेट्टे मिडलरने तर टेक्सासच्या या गर्भपाताच्या कायद्याला तीव्र विरोध करत सेक्स स्ट्राईकची (SEX strike) हाक दिली आहे. स्त्रियांना मूल जन्माला घालायचे किंवा नाही याचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार मिळेपर्यंत निषेध केला जाईल, असे त्यांनी ठणकावून सांगितलं आहे. या नव्या कायद्याचा सर्व मानवाधिकार कार्यकर्ते आणि महिला संघटना सातत्याने निषेध करत आहेत. महिला त्यांच्या घटनात्मक अधिकारांची मागणी करत आहेत. पण त्यांच्या जखमांवर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं मीठ चोळण्याचेच काम केलं असून सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी दिलेल्या निर्णयामध्ये टेक्सास कायद्याला स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्याचा परिणाम संपूर्ण देशावर झाला आहे आणि जवळजवळ सर्व राज्यांमध्ये महिलांचे आंदोलन सुरू झाले आहे आहे. या आंदोलन रोखण्यासाठी आता अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना आता सिनेटच्या माध्यमातून निर्णायक निर्णय घ्यावा लागणार आहे. हे वाचा - Skin Care Tips: लॅपटॉप-मोबाइलच्या अतिवापरामुळं तुमची त्वचाही होऊ शकते खराब; अशी घ्या काळजी अमेरिकन समाज हा जगातील सर्वात पुरोगामी मानला जातो, जिथे स्त्रिया गर्भपाताला वाईट गोष्ट मानत नाहीत, पण ती त्यांना त्यांचा मूलभूत आणि घटनात्मक अधिकार मानतात आणि त्यांना खात्री आहे की कोणताही कायदा करून त्यांच्याकडून हा अधिकार काढून घेतला जाऊ शकत नाही. हा टेक्सास कायदा नेमका काय आहे? या कायद्यानुसार, गर्भधारणेच्या सहा आठवड्यांनंतर जर एखाद्या महिलेचा गर्भपात झाला, तर तो गुन्हा मानला जाईल. यामध्ये अशी तरतूद करण्यात आली आहे की अशा कोणत्याही घटनेची बातमी मिळताच कोणताही नागरिक आरोपी महिला आणि गर्भपात करणारा दवाखाना आणि परिचारिका यांच्यावर गुन्हा दाखल करू शकेल. जर आरोप सिद्ध झाले तर, गुन्हा दाखल करणाऱ्या व्यक्तीला आरोपीकडून दहा हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे साडे सात लाख रुपये भरपाई मिळण्याचा हक्क असेल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: America

    पुढील बातम्या