VIRAL VIDEOS : पाणी उकळून लोक घराबाहेर फेकत आहेत आणि...

अमेरिकेतील अनेक भागात सध्या कडाक्याची थंडी पडली असून हवामान विभागाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 3, 2019 10:48 AM IST

VIRAL VIDEOS : पाणी उकळून लोक घराबाहेर फेकत आहेत आणि...

न्यूयॉर्क, 03 फेब्रुवारी: अमेरिकेतील अनेक भागात सध्या कडाक्याची थंडी पडली असून हवामान विभागाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. नॉर्थईस्ट आणि मिडवेस्ट भागात तापमान इतके खाली गेले आहे की उकळलेले पाणी हवेत फेकल्यावर 4 सेंकदात त्याचा बर्फ होत आहे. या थंडीमुळे अमेरिकेतील जगप्रसिद्ध नायगारा धबधबा गोठला आहे.

हे देखील वाचा: नद्या गोठल्या, विमान सेवा ठप्प... इतकी थंडी की पापण्यांवर जमा होतोय बर्फ

अमेरिकेतील या जीवघेण्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शाळांना सुट्टी देण्यात आली आहे तर विमान सेवा ठप्प झाली आहे. काही शहरातील तापमान अंटार्क्टिकापेक्षा कमी झाले आहे. शिकागोमधील सकाळचे वातावरण -30 इतके खाली गेले आहे. 29 फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या थंडी आणि बर्फवृष्टीमुळे परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आगामी काही दिवसात तापमान -55 इतके खाली जाऊ शकते. अशा प्रकारची थंडी जिवघेणी ठरण्याची शक्यता आहे.

आता इतकी थंडी म्हटल्यानंतर लोक घराबाहेर पडणार नाहीत असे तुम्हाला वाटत असेल तर थांबा. इतक्या कमी तापमानात अमेरिकेतील लोक थंडीची मजा घेत आहेत. सध्या घरात पाणी उकळून ते हवेत फेकले जात आहेत. थंडीमुळे उकळलेल्या पाण्याचे काही सेकंदात बर्फ होता किंवा ते हवेत उडून जाते. याचे अनेक व्हिडिओ करून सध्या सोशल मीडियावर शेअर केले जात असून असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.


Loading...बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 3, 2019 09:48 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...