Home /News /videsh /

आईच्या आठवणीत अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस झाल्या भावुक; PHOTOS शेअर करुन व्यक्त केली भावना

आईच्या आठवणीत अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस झाल्या भावुक; PHOTOS शेअर करुन व्यक्त केली भावना

वयाच्या 19 व्या वर्षी जेव्हा ती भारतातून इथं आली तेव्हा या क्षणाची कल्पनाही तिनं केली नसेल, अशा शब्दात कमला हॅरिस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

    वॉशिंग्टन, 15 जानेवारी : अमेरिकेच्या उपाध्यक्ष (US Vice President Elect) कमला हॅरिस (kamala Harris)  यांनी बुधवारी इन्स्टाग्रामवर आपल्या आईचे एक छायाचित्र शेअर केले असून, वाढत्या वयात त्यांच्यावर आईचा कसा प्रभाव पडला याबाबत एक पोस्ट लिहिली आहे. त्यांची आई श्यामला गोपालन (Shyamala Gopalan) या भारतातल्या तामिळनाडूहून अमेरिकेत स्थायिक झाल्या होत्या, तर त्यांचे वडील डोनाल्ड जे हॅरिस जमैकाहून अमेरिकेत आले होते. नोव्हेंबरमध्ये कमला हॅरिस यांनी उपाध्यक्षपदाची शर्यत जिंकली तेव्हा त्यांनी आपल्या आईप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अमेरिकच्या स्वप्नाचा पाठपुरावा करण्यासाठी त्या अमेरिकेत आल्या होत्या, असं त्यांनी म्हटलं होतं. कमला हॅरिस यांनी इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘माझी आई नेहमी म्हणायची,  नुसतं  इकडं तिकडं बसून आजूबाजूच्या गोष्टींबद्दल तक्रार करू नका, त्यापेक्षा स्वतः काहीतरी करा. मी त्या सल्ल्याचे अनुसरण करण्याचा प्रयत्न केला असून, तिनं आखून दिलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्या पुढे म्हणतात, त्यांचा जन्म ऑकलंडमध्ये झाला आणि त्यांची आई श्यामला गोपालन हॅरिस यांनीच त्यांना लहानाचं मोठं केलं. रंगाच्या पलीकडे जाऊन आपल्या क्षमतेवर कॅलिफोर्नियातील  बर्कले विद्यापीठात एक शास्त्रज्ञ म्हणून मानाचे पद मिळविणारी ती एक भारतीय महिला होती, असंही हॅरिस यांनी म्हटलं आहे. आपल्या आईबद्दल सांगताना कमला हॅरिस पुढं म्हणाल्या, ‘तिच्यामुळेच माझं पालनपोषण अशा समाजात झालं  जिथं त्यांना स्वतः पलिकडचं जग बघायला शिकवलं जातं. जिथं लोकांच्या संघर्षांबद्दल जागरूक आणि कनवाळू दृष्टीकोन ठेवण्याची शिकवण दिली जाते. हे ही वाचा-Explainer: दक्षिण कोरियन विद्यापीठातले विद्यार्थी हिंदीसाठी का झाले आक्रमक?
    नोव्हेंबरमध्ये अमेरिकेच्या निवडणुकीत कमला हॅरिस यांनी विजय मिळविला तेव्हा त्यांनी आपल्यावरील आईच्या प्रभावाबद्दल सांगितले होते. ‘आज मी इथं आहे ते केवळ माझी आई श्यामला गोपालन हॅरिस हिच्यामुळं, ती नेहमीच माझ्या मनात असते. वयाच्या 19 व्या वर्षी जेव्हा ती भारतातून इथं आली तेव्हा या क्षणाची कल्पनाही तिनं केली नसेल, अशा शब्दात कमला हॅरिस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र अमेरिकेत काळ्या रंगाची महिला उपराष्ट्रपती होऊ शकते असा तिला विश्वास होता, असंही त्यांनी नमूद केलं होतं. हॅरिस यांचा जन्म ऑकलंडमध्ये झाला, तर त्यांचं शिक्षण वॉशिंग्टन डीसीमधील काळ्या लोकांचे कॉलेज असा ऐतिहासिक वारसा असलेल्या हॉवर्ड विद्यापीठात झालं, त्यानंतर त्यांनी यूसी हेस्टिंग्ज इथं कायद्याचा अभ्यास केला. ऑगस्ट 2020 मध्ये झालेल्या एका भाषणात कमला हॅरिस यांनी आपल्या बालपणीच्या अनेक आठवणींना उजाळा देत, चेन्नईमध्ये आजोबांसमवेत केलेल्या लांबलचक फेरफटक्यांचा उल्लेख केला होता. त्या वेळी त्यांचे आजोबा लहानग्या कमलाला जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला जन्म देणाऱ्या नेत्यांच्या गोष्टी सांगत, अशी आठवणही सांगितली होती.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या