Home /News /videsh /

Surprise Diplomacy: अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री थेट Ukraine मध्ये; म्हणाले, रशियाचा काहीच भरवसा नाही!

Surprise Diplomacy: अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री थेट Ukraine मध्ये; म्हणाले, रशियाचा काहीच भरवसा नाही!

अमेरिकेनं सरप्राईज डिप्लोमसीचा आधार घेत आपल्या परराष्ट्रमंत्र्यांना थेट वादग्रस्त युक्रेनमध्ये धाडलं आहे. या घटनेमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

    किव्ह, 19 जानेवारी: रशिया (Russia) आणि नाटोमधील (NATO) तणाव शिगेला (Pressure) पोहोचला असतानाच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री (Secretary of State) अँटोनी ब्लिंकेन (Antony Blinken) हे थेट युक्रेनमध्येच (Ukraine) दाखल झाले आहेत. पूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का देत सरप्राईज डिप्लोमसी करण्याचा प्रयत्न अमेरिकेने या भेटीच्या माध्यमातून केला आहे. युक्रेनमध्ये झालेला सायबर हल्ला आणि युक्रेनच्या सीमेवर रशियाचं तैनात असणारं सैन्य अशा तणावाच्या पार्श्वभूमीवर ब्लिंकेन यांनी युक्रेनची राजधानी किव्ह गाठली असून राष्ट्रपती झेलेंसिकी यांच्याशी ते बातचित करणार आहे.  आयत्या वेळी दौऱ्यात बदल जिनिव्हामध्ये रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकेन यांची चर्चा ठरली होती. मात्र मात्र थेट जिनिव्हाला न जाता त्यांनी आपल्या दौऱ्यात बदल केले आणि युक्रेनला जाण्याचा निर्णय घेतला. युक्रेनमध्ये राष्ट्रपतींशी चर्चा विनिमय केल्यावर ते बर्लिनला जाणार आहेत.तिथं मित्रराष्ट्रांच्या सदस्यांसोबत ते चर्चा करतील आणि त्यानंतर रशियासोबत वाटाघाटी करण्यासाठी ते जिनिव्हाला रवाना होणार आहेत.  तणाव निवळण्याचा प्रयत्न युक्रेन प्रश्नावरून रशिया आक्रमक झाल्याचं चित्र आहे. रशियानं आपलं सैन्य युक्रेनच्या सीमेवर तैनात केलं असून सोमवारी सुपरसॉनिक फायटर विमानही आपल्या ताफ्यात दाखल केलं आहे. शिवाय युक्रेनप्रश्नी अमेरिका आणि नाटोनं आपली भूमिका एका आठवड्यात स्पष्ट करावी, असा निर्वाणीचा इशारा रशियानं दिला होता. या इशाऱ्याला आता एक आठवडा होत असून रशियाकडून कुठलीही आक्रमक पावलं उचलली जाण्यापूर्वी अमेरिकेनं डिप्लोमसी करत हवा थंड करण्याचा प्रयत्न केला आहे.  हे वाचा - काय आहे प्रकरण? रशियाचा शेजारी देश असणाऱ्या युक्रेनची युरोपीय देशांसोबतची वाढती जवळीक ही रशियासाठी चिंतेची बाब बनली आहे. त्यातच रशियाला आता नाटो संघटनांमध्ये सहभागी करून घेण्याच्या हालचाली वाढू लागल्यामुळे रशियानेही आपला दबाव वाढवला आहे. युक्रेनच्या सीमेवर रशियानं आपलं 1 लाख सैन्य तैनात करून ठेवलं असून दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिका आणि नाटो संघटनेनं युक्रेनचा समावेश नाटोमध्ये न करण्याचं लेखी आश्वासन द्यावं, अशी मागणी रशियानं केली आहे. मुदतीत या मागणीची पूर्तता न झाल्यास कडक पावलं उचलण्याचा इशाराही रशियानं दिला आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: America, Russia, Ukraine news

    पुढील बातम्या