Home /News /videsh /

US Elections अमेरिकेत या वेळी सोपं नाही मतदान करणं; जाणून घ्या कारणं

US Elections अमेरिकेत या वेळी सोपं नाही मतदान करणं; जाणून घ्या कारणं

अमेरिकेत Coronavirus च्या पार्श्वभूमीवर मतदानाचे काही नियम कडक करण्यात आले आहेत. भारतातही बिहार, मध्य प्रदेशात लवकरच मतदान होणार आहे. काय आहेत Covid काळातली निवडणूक आव्हानं?

    वॉशिंग्टन, 22 ऑक्टोबर : सगळ्या जगात कोरोनाची लस (Corona vaccine) शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग, हात धुणं हेच पर्याय सध्या प्रचलित आहेत. सणांच्या दिवसात गर्दी वाढण्याची शक्यता आहे. भारतात बिहारमध्ये निवडणूक आहे. तसंच अमेरिकेत 3 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षांची निवडणूक आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतही मतदान करणं तसं सोपं नाही, जाणून घेऊ या या मागे काय कारण आहे. निवडणुकीतील आव्हानं सामान्यपणे कुठल्याही देशातील निवडणुकीत उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी कष्ट करावे लागतात. मतदान केंद्रांपर्यंत पोहोचणं आणि तिथं रांगांत उभं राहणं या गोष्टी अमेरिकेतील नागरिकांनाही कराव्या लागतात. या वेळी कोरोनामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था झाली आहे. लॉकडाउनचा परिणाम लॉकडाउनमुळे या निवडणुकीत मतदान केंद्रांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची कमतरता जाणावणार आहे. ही संखा कमी झाल्यामुळे निवडणूक नियोजन करणाऱ्यासोबतच मतदारांनाही त्रास सहन करावा लागणार आहे. काही राज्यांत निवडणुकीसाठी सध्या घातलेल्या निर्बंधांमध्ये सूट देण्याचं सरकारनी जाहीर केलं आहे तरीही मतदान करणं नागरिकांना अवघड जाणार आहे. रांगा लावणं जॉर्जियात हजारो मतदारांना मतदानाच्या रांगेत अनेक तास उभं रहावं लागलं होतं. पोलिंग बूथची कमी संख्या, कार्यकर्त्यांची कम संख्या कॉम्प्युटरमधील बिघाड अशी कारणं त्यासाठी कारणीभूत होती. 2016 च्या निवडणुकीत गौरवर्णाचे लोक सरासरी 10 मिनिटं तर कृष्णवर्णीय लोक सरासरी 16 मिनिटं मतदानाच्या रांगेत थांबले होते. मतदानासाठी तासनतास रांगेत उभं राहिलेल्या रोजंदारीवरील नागरिकांना त्याचा भत्ताही मिळाला नव्हता, असं मॅसेच्युसेट इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सर्वेक्षणात दिसून आलं होतं. आता तर मतदानाच्या रांगेत कोरोनाच्या नियमांचं पालन करायचं आहे त्यामुळे अधिक वेळ लागू शकतो. प्रिंट आउट आणि नवा नियम मतदानाला येताना एका फॉर्मची प्रिंटआउट घेऊन येणं बंधनकारक करण्यात आलं आहे त्यामुळे ज्यांच्याकडे प्रिंटर नाही अशा सर्व गरीब नागरिकांची अडचण होणार आहे. पेनसिल्व्हिनिया स्टेट सुप्रीम कोर्टानी मतदाराची ओळख पटवणारं कागदपत्र असणारं पाकिट असल्याशिवाय पोस्टानी पाठवलेली मतं बेकायदेशीर मानली जातील असं जाहीर केलं आहे. मतदानाला थोडेच दिवस राहिले आहेत त्या दृष्टिने हा निर्णयच जास्त अडचणीचा ठरू शकतो. मत देण्यासाठी प्रवास ग्रामीण अमेरिकेत लोकांना अनेक तास गाडी चालवून मतदान केंद्रांपर्यंत पोहोचावं लागणार आहे. अमेरिकेचं क्षेत्रफळ मोठं आणि भारताच्या तुलनेत लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे मतदान केंद्रांची संख्या कमी आहे. भारतात कर्मचारीही भरपूर असल्यामुळे 10-15 मतदारांसाठीही मतदान केंद्र असतं. तसं अमेरिकेत नाही. त्याचबरोबर मतदान ओळखपत्र सोबत असणं बंधनकारक आहे. मतदानासंबंधी इतर कायद्यांमुळेही मतदारांना मतदान करता येणं अवघड होणार आहे. तज्ज्ञांना वाटतं की या सर्व अडचणींहून मोठी अडचण कोरोना महामारी आहे. त्यामुळे मतदान करणं अवघड होऊन बसणार आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: United States of America, US elections

    पुढील बातम्या