US Election 2020 : बायडन यांची गाडी निघाली सुसाट, डोनाल्ड ट्रम्प पुन्हा पिछाडीवर!

US Election 2020 : बायडन यांची गाडी निघाली सुसाट, डोनाल्ड ट्रम्प पुन्हा पिछाडीवर!

जो बायडन (joe biden) यांनी पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना मागे टाकत जोरदार मुसंडी मारली आहे.

  • Share this:

अमेरिका, 04 नोव्हेंबर : संपूर्ण जगाचे लक्ष्य लागलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत (US President Election 2020) अत्यंत चुरशीची लढत सुरू आहे.  जो बायडन (joe biden) यांनी पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना मागे टाकत जोरदार मुसंडी मारली आहे.

आतापर्यंत हाती आलेल्या नवीन आकडेवारीनुसार, डेमोक्रेटिक पक्षाचे नेते जो बाइडन यांनी 236 जागांवर आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प हे 213 जागांवर लढत देत आहे.

अमेरिकेतील 50 पैकी 22 राज्यांचा कल हाती आला आहे. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवला आहे. तर आणखी 5 राज्यांमध्ये ते आघाडीवर आहे. तर कॅलिफोर्नियासह 11 राज्यांमध्ये बायडन यांनी विजय मिळवला आहे. तर 3 राज्यात बायडन आघाडीवर आहे.

पत्नीला दरमहा पैसे ट्रान्सफर करत असाल तर तिलाही येणार Income Tax नोटीस?

परंतु, हाती आलेल्या निकालावर दोन्ही नेत्यांनी असमाधान व्यक्त केले आहे. मतमोजणीत अनेक ठिकाणी गैर प्रकार सुरू आहे, असा गंभीर आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला असून सर्वोच्च न्यायालयात जाण्याची घोषणा केली आहे. तर बायडन यांनी सुद्धा कोर्टात जाण्याची तयारी केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपणच निवडणूक जिंकलो आहोत, असा दावा केला आहे. त्यामुळे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून अमेरिकेतील नागरिकांचा आभार मानले आहे. 'आम्ही निवडणूक जिंकत आलो आहोत, त्यामुळे जल्लोषाची तयारी सुरू केली होती. पण अचानक वातावरण बदलले आहे. टेक्सास, फ्लोरिडामध्ये आम्ही मोठ्या संख्येनं विजयी झालो आहोत, पण तिथे मतं मोजली जात नाही असं समोर आले आहे. नॉर्थ कॅरोलिनामध्ये आम्ही आघाडीवर आहोत. पण, अनेक ठिकाणी गैरप्रकार सुरू आहे', असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांच्या आरोपानंतर एका राज्यातील मतमोजणी ही थांबवण्यात आली आहे.

US Election 2020: डोनाल्ड ट्रम्प की जो बायडन, भारतासाठी कोण फायद्याचं?

तसंच, 'जो बायडन हे निवडणूक हरले आहेत, पण ते पराभव स्वीकारत नाही. त्यामुळेच त्यांनी कोर्टात जाण्याची तयारी केली आहे', असा टोलाही ट्रम्प यांनी लगावला.  'आम्ही ही निवडणूक जिंकणारच आहोत. हळूहळू पुढे सरकत आहोत. पण, चिंता करण्याची गरज नाही. विजय आपलाच होईल', असा विश्वासही ट्रम्प यांनी व्यक्त केला.

Published by: sachin Salve
First published: November 4, 2020, 2:20 PM IST
Tags:

ताज्या बातम्या