US Election 2020 : खन्ना, कृष्णमृर्तींनी दिला ट्रम्प यांना झटका, दणदणीत जिंकल्या 4 जागा!

US Election 2020 : खन्ना, कृष्णमृर्तींनी दिला ट्रम्प यांना झटका, दणदणीत जिंकल्या 4 जागा!

डॉ. एमी बेरा (Dr. Ami Bera), प्रमिला जयपाल (Pramila Jayapal), रो खन्ना (Ro Khanna) आणि राजा कृष्णमूर्ती (Raja Krishnamoorthi) यांनी अमेरिकेच्या निवडणुकीत बाजी मारली आहे.

  • Share this:

अमेरिका, 04 नोव्हेंबर : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची (US President Election 2020) मतमोजणी अंतिम टप्प्यात सुरू आहे.  जो बायडन (joe biden) आणि डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यामध्ये अटीतटीची लढत सुरू आहे. तर दुसरीकडे भारतीयांसाठी अभिमानाची बाब म्हणजे, मुळ भारतीय निवासी असलेल्या चार उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

अमेरिका काँगेसच्या खालच्या सदनातील प्रतिनिधी सभेच्या डेमोक्रेटिक पक्षाकडून चार उमेदवार निवडणूक लढवत होते. हे चारही उमेदवार भारतीय निवासी आहे. डॉ.एमी बेरा (Dr. Ami Bera), प्रमिला जयपाल (Pramila Jayapal), रो खन्ना (Ro Khanna) आणि राजा कृष्णमूर्ती (Raja Krishnamoorthi) अशी चौघांची नावं आहे.  या चौघांनीही जो बायडन यांच्या डेमोक्रेटिक पक्षाकडून निवडणूक लढवली आणि जिंकली आहे. एकाच वेळी चारही भारतीय निवासी असलेल्या उमेदवारांचा विजय झाल्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या नियमांत मोठी शिथिलता; सिनेमा हॉल, नाट्यगृहांबाबत घोषणा

तर दुसरीकडे श्रीनिवास कुलकर्णी उर्फ श्री प्रेस्टन कुलकर्णी हे सुद्धा अमेरिकन निवडणुकीच्या मैदानात आहे.  ट्रम्प (Donal Trump) यांच्या धोरणांमुळे देशाचं नुकसान होत आहे, असं वाटून डिप्लोमॅटिक सेवेचा राजीनामा देत दोन वर्षांपूर्वीच कुलकर्णी राजकारणात सक्रिय झाले. त्यांना डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी सुद्धा मिळाली. आता ट्रम्पविरोधात दंड थोपटून ते टेक्सासमधून (Texas) निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराला कडवी लढत देत आहेत. कुलकर्णी ही निवडणूक जिंकले तर टेक्सासमधून निवडून येणारे ते पहिले हिंदू अमेरिकन ठरतील.

दरम्यान, आतापर्यंत हाती आलेल्या नवीन आकडेवारीनुसार, डेमोक्रेटिक पक्षाचे नेते जो बायडन यांनी 2224 जागांवर आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प हे 213 जागांवर लढत देत आहे.

अमेरिकेतील 50 पैकी 22 राज्यांचा कल हाती आला आहे. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवला आहे. तर आणखी 5 राज्यांमध्ये ते आघाडीवर आहे. तर कॅलिफोर्नियासह 11 राज्यांमध्ये बायडन यांनी विजय मिळवला आहे. तर 3 राज्यात बायडन आघाडीवर आहे.

विमानात खेळत होती लपाछपी; फ्लाईट कर्मचाऱ्यांनी अशी अद्दल घडवली की...

परंतु, हाती आलेल्या निकालावर दोन्ही नेत्यांनी असमाधान व्यक्त केले आहे. मतमोजणीत अनेक ठिकाणी गैर प्रकार सुरू आहे, असा गंभीर आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला असून सर्वोच्च न्यायालयात जाण्याची घोषणा केली आहे. तर बायडन यांनी सुद्धा कोर्टात जाण्याची तयारी केली आहे. अजूनही मतमोजणी सुरू असून बायडन आणि ट्रम्प यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्षाला पूर्ण बहुमत गाठण्यासाठी 270 जागांची गरज आहे.

Published by: sachin Salve
First published: November 4, 2020, 5:31 PM IST
Tags:

ताज्या बातम्या