US Election : अमेरिकन निवडणुकीचे निकाल कधी? ट्रम्प यांना घाई असली तरी यावर्षी होणार विलंब

जाणून घ्या अमेरिकेत कधी येणार राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीचा (US presidential election result) अंतिम निकाल? ट्रम्प (Donald Trump) यांनी मतमोजणी रात्रीच करावी असं सांगितलं असलं, तरी यावर्षीच्या निकालाला विलंब होऊ शकतो.

जाणून घ्या अमेरिकेत कधी येणार राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीचा (US presidential election result) अंतिम निकाल? ट्रम्प (Donald Trump) यांनी मतमोजणी रात्रीच करावी असं सांगितलं असलं, तरी यावर्षीच्या निकालाला विलंब होऊ शकतो.

  • Share this:
    वॉशिंग्टन, 3 नोव्हेंबर : अमेरिकेत कोरोना व्हायरस दरम्यान प्राथमिक निवडणुका घेतल्या गेल्या त्याचा शेवटचा टप्पा आज आहे. सुरुवातीच्या मतदानात निम्म्याच्या वर लोकसंख्येने मतदान केलं. निवडणुकांनंतर मतमोजणी आणि निकाल या गोष्टींसाठी बराच कालावधी लागणार आहे. डोनल्ड ट्रम्प यांची 3 नोव्हेंबरच्या रात्रीच मतमोजणी व्हावी, अशी इच्छा आहे. पण ते शक्य नाही. निकाल कधी येणार ते जाणून घ्या. ट्रम्प यांच्या या विधानाने खळबळ उडाली निवडणूक सभेदरम्यान विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच एक विचित्र विधान केले आहे ते म्हणाले की निवडणुका आठवड्यानंतर नव्हे तर 3 नोव्हेंबर रोजी संपल्या पाहिजेत त्यांनी जवळजवळ धमकीच्या स्वरात हे सांगितले. त्यांच्या मते योग्य निवडणूक म्हणजेच ती जी झाल्याझाल्या मतमोजणी केली जाते. या गोष्टीसाठी बराच वेळ लागल्या नंतर कधीकधी निकाल चुकीचा येण्याची शक्यता असते. उशीर झाल्यास कोर्टात दाखल होऊ शकते तक्रार ट्रम्प यांनी अशी धमकी दिली आहे की जर मतमोजणीला जास्त कालावधी लागला व मतमोजणी लवकर झाली नाही तर ते ही बाब न्यायालयात खेचू शकतात. आधीच झाला आहे उशीर प्रत्यक्षात ट्रम्प जे बोलत आहेत ते कधीच शक्य झालं नाही. मध्यरात्रीपर्यंत सर्व मतमोजणी करणं आणि लगेचच त्याचा निकाल लावणं हे अवघड प्रक्रिया आहे. अमेरिकेत कोणतेही राज्य निवडणुकीचा रात्री निकाल देत नाही.‌ याबाबत कधी त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा सुद्धा ठेवली गेलेली नाही. मीडिया अंशिक मतमोजणी दाखवते निवडणुकीचा रात्री अमेरिकन लोक कोणाचा विजय होऊ शकतो याच्या बाबतीत अंदाज घेतात. याबाबतच्या अंदाज घेण्यासाठी मीडिया त्यांना मदत करते. जेव्हा मीडिया अंशिकरित्या मतमोजणी दाखवतो त्यावेळेस दोन मतदारांमध्ये बराच फरक असल्यास कोण जिंकू शकेल हे समजणं सोपे जाते. गणना करायला लागतो महिन्याभराचा कालावधी निवडणुकीचा निकाल अमेरिकेत येण्यासाठी बराच काळ लागतो उदाहरणार्थ डेलावेरमध्ये जर निवडणुकीच्या दोन दिवसांत गणना केली आणि निकाल लागला तर कॅलिफोर्नियामध्ये या गोष्टीला एक महिना लागू शकतो. त्यामागील एक कारण म्हणजे मतपेटीतून मतदान करणं. ज्यात मतमोजणी करण्यास वेळ लागतो. या परिस्थितीत ट्रम्प यांनी असं म्हटले आहे की 3 नोव्हेंबरला मध्यरात्रीपासून राज्यांनी मतमोजणी थांबवावी नाहीतर गडबड होऊ शकते. परंतु यामुळे अमेरिकन निवडणुकांची संपूर्ण प्रक्रिया नष्ट होईल व त्याच वेळी मनापासून मत दिलेल्या लाखो मतदारांची फसवणूक होऊ शकेल. पोस्टल वोटिंगवर ट्रम्प यांनी दाखवला होता अविश्वास ट्रम्प यांनी आधीच पोस्टल मतदान पद्धत वाईट असल्याचे म्हटले होते. त्यांचे असे म्हणणे होते की लोक मेलबॉक्समधून मतपत्रिका काढू शकतात आणि असे बरेच प्रकार घडले आहेत. त्यामुळे यावेळी अमेरिकेत कसे मतदान करावे या बाबतीत अनेक प्रश्न उभे राहिले होते. याचा परिणाम मतदानावर झाला असावा असे म्हटले जात आहे. योग्य साधन नसल्यामुळे वेळ लागणार आहे मतमोजणी करायला योग्य असं साधन नसल्यामुळे वेळ लागू शकतो. याच गोष्टीचा परिणाम पेनसिल्व्हेनियासारख्या बऱ्याच राज्यांना होणार आहे. फ्लोरिडा, जॉर्जिया, अरिझोना यासारख्या अनेक राज्यात 2018 मध्ये ही घटना घडली होती. तसेच ट्रम्प ज्या मोजणीच्या गोंधळाबद्दल बोलत आहेत ते आधी एकदा होऊन गेले आहेत. 2000 साली राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळी फ्लॉरिडामध्ये पुन्हा मतमोजणी करावी लागली होती आणि हे प्रकरण कोर्टापर्यंत गेले होते. Keyword- Link-
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published: