US Election 2020 मध्ये मोठा ट्वीस्ट, जो बायडन विजयाच्या उंबरठ्यावर

US Election 2020 मध्ये मोठा ट्वीस्ट, जो बायडन विजयाच्या उंबरठ्यावर

जो बायडन यांनी ट्वीट करून विश्वास ठेवा आम्ही जिंकू असं ट्वीट करत समर्थकांना आश्वस्त केलं आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 05 नोव्हेंबर : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुका पार पडल्या आणि त्यासाठी मतमोजणी देखील सुरू आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या या मतमोजणीदरम्यान मोठा ट्वीस्ट आला आहे. जो बायडन यांची गाडी सुसाट निघाली असून त्यांना आता विजयासाठी केवळ 6 मतांची गरज आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांना विजयासाठी मोठी मजल गाठावी लागणार आहे. अटीतटीच्या या लढतीमध्ये अखेरच्या टप्प्यात जो बायडन विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले असताना अंतिम निकाल काय येतो? याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

वॉशिंग्टन पोस्टनं दिलेल्या वृत्तानुसार बायडन यांना 50.5 तर डोनाल्ड ट्रम्प यांना 48 टक्के मतं मिळाली आहे. जो बायडन यांना अमेरिकेचे पुढचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी आता केवळ 6 मतांची आवश्यकता आहे. न्यूज एजन्सी एपीच्या म्हणण्यानुसार, जो बायडन यांनी मिशिगन आणि विस्कॉन्सिन या प्रमुख स्विंग राज्यांमध्ये विजय मिळवून 264 मते मिळविली. डेमोक्रॅटिक उमेदवाराला व्हाईट हाऊसमध्ये पोहोचण्यासाठी फक्त आणखी एका राज्यात विजय मिळवणं गरजेचं आहे.

हे वाचा-आनंद महिंद्रांनी US election बद्दल ट्विटरवर घेतला पोल; यूजर्सचे भन्नाट रिप्लाय

जो बायडन यांनी ट्वीट करून विश्वास ठेवा आम्ही जिंकू असं ट्वीट करत समर्थकांना आश्वस्त केलं आहे. विजयाच्या अगदी जवळ आल्यानंतर बायडन यांनी ट्वीट करून आपल्या समर्थकांना आश्वासन दिले. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडन आणि त्यांच्या पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. पेन्सिल्वेनियामधून 5 लाख मतं गायब झाल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

मतमोजणीत अनेक ठिकाणी गैर प्रकार सुरू आहे, असा गंभीर आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला असून सर्वोच्च न्यायालयात जाण्याची घोषणा केली आहे. तर बायडन यांनी सुद्धा कोर्टात जाण्याची तयारी केली आहे. अजूनही मतमोजणी सुरू असून बायडन आणि ट्रम्प यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्षाला पूर्ण बहुमत गाठण्यासाठी 270 जागांची गरज आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 5, 2020, 7:56 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading