Home /News /videsh /

इराणकडून युद्धाचे निशाण तर ट्रम्प यांचा इशारा, अमेरिकेनं हल्ल्यासाठी निवडलीत 52 ठिकाणं

इराणकडून युद्धाचे निशाण तर ट्रम्प यांचा इशारा, अमेरिकेनं हल्ल्यासाठी निवडलीत 52 ठिकाणं

इराणने युद्धाचे निशाण फडकवल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आम्ही 52 ठिकाणं हल्ला करण्यासाठी निवडली आहेत. मोठा विध्वंस होईल असा इशारा दिला आहे.

    फ्लोरिडा, 05 जानेवारी : इराण लष्कराचा प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी याला रॉकेट हल्ल्यात ठार केल्यानंतर इराण-अमेरिका यांच्यात तणाव वाढला आहे. सुलेमानीला ठार केल्यानंतर आणखी एक हल्ला इराणवर करण्यात आला. त्यानंतर इराकची राजधानी बगदादमधील अमेरिकन दुतावासावर आज हल्ला झाला. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट इशारा दिला आहे. जर इराणने अमेरिकेच्या जवानांवर किंवा संपत्तीवर हल्ला केला तर आम्ही तुमची 52 ठिकाणं उद्धस्त करू असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करून आक्रमक इशारा दिला आहे.  इराण जर बदला घेण्याची धमकी देत असेल तर मी त्यांना इशारा देतो की त्यांनी जर कोणत्याही अमेरिकेच्या ठिकाणावर हल्ला केला तर आम्ही इराणची 50 ठिकाणं शोधली आहेत. (52 हा आकडा त्या अमेरिकन कैद्यांचा आहे ज्यांना इराणने बंदी केलं)ही 52 ठिकाणं अत्यंत महत्वाची असून इराणच्या संस्कृती याठिकाणी आहे. इथं मोठा विध्वंस होईल असा हल्ला केला जाईल. आता अमेरिकेला आणखी धोका पोहचवण्याचा प्रयत्न करू नका. दरम्यान, अमेरिकेकडून सलग दोन दिवस झालेल्या हल्ल्यानंतर इराणनेसुद्धा युद्धाचे निशाण फडकवले आहे. कासिम सुलेमानी ठार झाल्यानंतर इराणनने कौममधील मुख्य मशिदीवर लाल झेंडा फडकावला. याचा अर्थ इराणनेदेखील युद्धासाठी तयार असल्याचा इशारा दिला आहे. इराणच्या इतिहासात मशिदीवर लाल झेंडा फडकावल्याचं पहिल्यांदाच घडल्याचं म्हटलं जात आहे. अमेरिकेने गुरुवारी रात्री इराणचा टॉप कमांडर कासिम सुलेमानी याला रॉकेट हल्ल्यात ठार केलं होतं. त्यानंतर पुन्हा शनिवारी अमेरिकेने हवाई हल्ला केला होता. यात 6 जण ठार झाले होते. या हल्ल्याला प्रतित्युत्तर देण्यासाठी इराणनं रात्री उशिरा अमेरिकेच्या मशिदीवर लाल झेंडा फडकवला तर सैन्यतळावर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. बगदादमध्ये अमेरिकन दुतावास आणि एअरबेसवर हल्ला, 5 जण जखमी सुलेमानी पश्चिम आशियात इराणी कारवायांमागचा सूत्रधार मानला जातो. त्याने सिरियामध्ये जाळं पसरवलं होतं तसंच इस्रायलमध्ये रॉकेट हल्ला करण्याचाही आरोप त्याच्यावर होता. अमेरिका त्याच्या मागावर होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड़ ट्रम्प यांनी सुलेमानी ठार झाल्यानंतर काही वेळातच अमेरिकेच्या झेंड्याचा फोटो ट्विट केला होता. गेल्या वर्षीपासून इराण-अमेरिका संघर्ष वाढला होता. अमेरिकेने इराणवर अनेक निर्बंध घातले आहेत. अमेरिकेचा हवाई हल्ला, थेट तुमच्या खिशावर होणार हे 6 परिणाम
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Donald Trump

    पुढील बातम्या