ट्रम्प यांनी चीनला दिला दणका; अडचणीत आणणाऱ्या विधेयकावर केली स्वाक्षरी

ट्रम्प यांनी चीनला दिला दणका; अडचणीत आणणाऱ्या विधेयकावर केली स्वाक्षरी

अमेरिकेने एक विधेयक मंजूर केलं आहे. चीनवरचा दबाव या नव्या कायद्याने वाढणार आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 18 जून : भारत-चीन सीमेवर तणाव सुरू असताना अमेरिकेतून चीनला एक दणका बसला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधल्या अल्पसंख्याकांचा छळ करणाऱ्यांच्या विरोधातल्या एका विधेयकाला मंजुरी दिली आहे. चीनवरचा दबाव या नव्या कायद्याने वाढणार आहे.

चीनमध्ये उइगर मुस्लीमांविरोधात होणाऱ्या मोहिमेत सहभागी झालं तर आता अमेरिका कारवाई करणार आहे. उइगर मुस्लिमांच्या मानवी हक्कांचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने अमेरिकेनं हे पाऊल उचललं आहे. यामुळे चीनवरचा वचक वाढला आहे. उइगरांचा छळ करणाऱ्यांवर थेट कारवाईची तरतूद या अमेरिकन कायद्यात आहे. चीनमध्ये उइगर मुस्लिमांवर अनन्वित अत्याचार होत आहेत. अल्पसंख्याकविरोधी कारवाईत सहभागी होणाऱ्यांना चिन्यांवर या विधेयकामुळे वचक बसेल अशी आशा आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंदाजानुसार, किमान दहा लाख मुस्लिमांना चीनच्या शिनझियांग प्रांतातल्या छावण्यांमध्ये डांबून ठेवलं आहे. या छावण्यांमध्ये त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देत असल्याचा चीनचा दावा असला, तरी प्रत्यक्षात त्या या धार्मिक अल्पसंख्याकांच्या छळछावण्या आहेत. वर्ल्ड उइगर काँग्रेस या उइगर मुस्लिमांच्या मोठ्या संघटनेने डोनाल्ड ट्रम्प यांचे या नव्या विधेयकासाठी आभार मानले आहेत. उइगर जमातीसाठी यातून आशेचा किरण दिसत असल्याची प्रतिक्रिया या संघटनेने दिली आहे.

TikTok सह 52 चिनी अ‍ॅप बंद करा, गुप्तचर संस्थेची केंद्र सरकारला शिफारस

उंची लहान, किर्ती महान!भारतीय सेनेमध्ये रूजू होण्याचं स्वप्न जिद्दीने केलं पूर्ण

First published: June 18, 2020, 4:26 PM IST

ताज्या बातम्या