मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

President Elect बायडन यांची सगळी प्रेस टीम आहे फक्त स्त्रियांची! भारतीय वंशाच्या महिलेकडे महत्त्वाची जबाबदारी

President Elect बायडन यांची सगळी प्रेस टीम आहे फक्त स्त्रियांची! भारतीय वंशाच्या महिलेकडे महत्त्वाची जबाबदारी

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष (US President Elect) जो बायडन (Joe Biden) यांनी आपल्या प्रेस टीममध्ये (Press Team) फक्त स्त्रियांना स्थान दिलं आहे. Neera Tanden यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष (US President Elect) जो बायडन (Joe Biden) यांनी आपल्या प्रेस टीममध्ये (Press Team) फक्त स्त्रियांना स्थान दिलं आहे. Neera Tanden यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष (US President Elect) जो बायडन (Joe Biden) यांनी आपल्या प्रेस टीममध्ये (Press Team) फक्त स्त्रियांना स्थान दिलं आहे. Neera Tanden यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

वॉशिंग्टन, 30 नोव्हेंबर : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष (US President Elect) जो बायडन (Joe Biden) यांनी आपल्या प्रेस टीममध्ये (Press Team) केवळ महिलांना स्थान दिलंं आहे. अमेरिकेच्या इतिहासात राष्ट्राध्यक्षाच्या प्रेस टीममध्ये केवळ महिलांचा समावेश असण्याची घटना पहिल्यांदा घडली आहे. या टीमचे नेतृत्व केट बेडिंगफिल्ड  (Kate Bedingfield) करणार असून त्या बायडन यांच्या कॅम्पेनच्या डेप्युटी कम्युनिकेशन डायरेक्टरदेखील होत्या. याचबरोबर भारतीय वंशाच्या नीरा टंडन (Neera Tanden) यांना देखील प्रशासनात महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. बायडन यांनी आपण आपल्या प्रशासनात विविधता ठेवणार असून देशाच्या विविधतेचे दर्शन आपल्या प्रशासनातून दिसणार असल्याचा दावा त्यांनी यापूर्वी केला होता.

माजी राष्ट्राध्यक्ष  बराक ओबामा (Barack Obama) यांच्या कार्यकाळात व्हाइट हाऊसच्या कम्युनिकेशन डायरेक्टर राहिलेल्या जेन साकी या बायडन यांच्या प्रेस सेक्रेटरी असतील. बायडन यांनी दीर्घकाळापासून डेमॉक्रॅटिक पक्षाच्या प्रवक्त्या जेन साकी यांना त्यांचे प्रेस सचिव बनविण्याचा निर्णय घेतला होता.  बायडन यांनी एक निवेदन जारी करत अमेरिकेच्या लोकांशी थेट व योग्य संवाद साधणे ही राष्ट्रपतींची जबाबदारी आहे. अमेरिकन लोकांशी व्हाइट हाऊस जोडण्याची जबाबदारी या टीमची असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. ही टीम हे काम योग्य प्रकारे करेल याची मला खात्री आणि विश्वास आहे. टीममधील योग्य आणि अनुभवी  कम्युनिकेटर विविध विषयांवर काम करतील. सर्व पुन्हा अमेरिकेला चांगले बनविण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी होतील, असे देखील त्यांनी आपल्या या निवेदनात म्हटलं आहे.  तर दुसरीकडे सिमोन सँडर्स आणि अश्ली एटिने या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या  दोन मुख्य प्रेस अधिकारी असतील. कॅबिनेट पदांप्रमाणेच प्रेस कार्यालयाला देखील सिनेटच्या मंजूरीची आवश्यक नसते.

भारतीय वंशाच्या नीरा यांना मिळणार ही जबाबदारी

CNN वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार नीरा टंडन यांना बायडन यांच्या धोरणांच्या अंमलबजावणीची  देखरेख करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. सध्या त्या अमेरिकेच्या सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेस नावाच्या थिंक टँकच्या अध्यक्ष आणि सीईओ आहेत. व्हाईट हाऊसमध्ये जबाबदारी देण्यात येणाऱ्या तिन्ही महिलांनी बाराक ओबामा यांच्या प्रशासनात देखील काम केले आहे. बायडन उपराष्ट्रपती असताना बेडिंगफील्ड त्यांच्या  कम्युनिकेशन डायरेक्टर आणि प्रवक्त्या होत्या. साकी व्हाइट हाउसच्या स्टेट डिपार्टमेंटमध्ये  कम्युनिकेशन डायरेक्टर आणि प्रवक्त्या होत्या. तर टंडेन यांनी ने तत्कालीन हेल्थ अँड ह्यूमन सेक्रेटरी कॅथलीन सेबेलियस यांच्या सिनिअर अडवायझर म्हणून काम केले आहे.

महिलांना मिळणार सर्वाधिक प्रतिनिधित्व

बायडन यांना सोमवारी प्रेसिडेंशियल इंटेलिजन्स ब्रीफिंग केलं जाणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाच्या वतीने कळवण्यात आले आहे. मॅनेजमेंट आणि बजेट ऑफिससाठी देखील महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. बायडन यांच्या टीममधील दुसऱ्या महिलांविषयी बोलायचे झाल्यास वाइस प्रेसिडेंट इलेक्टच्या चीफ ऑफ स्टाफ राहिलेल्या  कॅरीन जीन पीयरे या बायडन यांच्या प्रिंसिपल डिप्टी प्रेस सेक्रेटरी असणार आहेत. तर पाइली टोबर याना व्हाईट हाऊसच्या डिप्टी कम्युनिकेशन्स डायरेक्टर बनवले जाणार आहे.  याबरोबरच सेसिलिया रूझ यांना आर्थिक सल्लागार मंडळाची जबाबदारी दिली जाऊ शकते. या व्यतिरिक्त एडेयेमो यांना ट्रेझरी विभागाचे डेप्युटी केले जाऊ शकते. अर्थशास्त्रज्ञ जारेड बर्न्टस्टीन आणि हीथ बाऊश यांना आर्थिक सल्लागार केले जाऊ शकते.  न्यूयॉर्क टाईम्सने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, बायडन यांनी ब्रायन डीसला व्हाईट हाऊस राष्ट्रीय आर्थिक परिषदेचे प्रमुख बनविण्याचा निर्णय घेतला आहे.

20 जानेवारीला शपथ घेणार बायडन

निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर बायडन आपल्या कॅबिनेटमध्ये पहिल्या पसंतीच्या उमेदवारांची निवड करत आहेत. अमेरिका पुन्हा परत अली आहे हे माझ्या कॅबिनेटमधून दिसणार असल्याचे त्यांनी मागील आठवड्यात म्हटले होते. त्यांची टीम जगाचे नेतृत्व करण्याबरोबरच त्यांच्या देशाला सुरक्षित देखील ठेवेल. याच आठवड्यात त्यांचा श्वान मेजर याच्याबरोबर खेळताना घसरून पडल्याने त्यांच्या पायाला हेअरलाईन फ्रॅक्चर झाले आहे.

त्यांचे डॉक्टर केविन ओ कॉनर यांच्या मते बायडन यांनी काही आठवडे एक वॉकिंग बूट घालावा लागणार आहे. 20 जानेवारीला बायडन राष्ट्रपती पदाची शपथ घेणार असून 30 नोव्हेंबरला त्यांना राष्ट्रपती म्हणून ब्रिफिंग केलं जाणार असून यामध्ये गोपनीय माहिती असते. एक आठवड्यापूर्वीच राष्ट्रपतींच्या सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

First published:

Tags: Joe biden