Home /News /videsh /

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘माझा पराभव झाला तर 20 दिवसांत चीन घेईल अमेरिकेचा ताबा’

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘माझा पराभव झाला तर 20 दिवसांत चीन घेईल अमेरिकेचा ताबा’

अमेरिकी अध्यपदाच्या निवडणुकीकडे (US presidential election 2020) साऱ्या जगाचं लक्ष आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन हे अध्यक्षपदाचे उमेदवार आहे. मात्र प्रचारादरम्यानच ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्रा आता ते निरोगी झाले आहेत.

अमेरिकी अध्यपदाच्या निवडणुकीकडे (US presidential election 2020) साऱ्या जगाचं लक्ष आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन हे अध्यक्षपदाचे उमेदवार आहे. मात्र प्रचारादरम्यानच ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्रा आता ते निरोगी झाले आहेत.

चीनने जगाला कोरोना व्हायरस दिला आहे. चीन आक्रमकपणे पुढे येत आहे. चीनला रोखायची ताकद ही फक्त आपल्या आक्रमक धोरणांमध्ये आणि प्रशासनात आहे असा दावाही त्यांनी केला.

    वॉशिंग्टन 15 ऑक्टोबर: अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. कोरोनावर मात करून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)  हे पुन्हा प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. बुधवारी त्यांनी देशातल्या अनेक शहरांमध्ये व्हर्च्युअल रॅली घेत भाषण केलं. या निवडणुकीत माझा पराभव झाला तर चीन 20 दिवसांच्या आत अमेरिकेवर आक्रमन करून देशाचा ताबा घेईल असं ट्रम्प म्हणाले. अमेरिकेत या वर्षाच्या शेवटपर्यंत कोविड-19 (Covid-19) वर लस आलेली असेल असा दावाही त्यांनी केला. अध्यक्ष ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमधून न्यूयॉर्क, शिकागो, फ्लोरिडा, पिट्सबर्ग, शोबोयगन आणि वॉशिंग्टन डीसी इथल्या इकॉनॉमिक क्लब समोर भाषण दिलं. ट्रम्प पुढे म्हणाले, अमेरिकेच्या भविष्यासाठी ही महत्त्वाची निवडणूक आहे. अमेरिकेची समृद्धी पाहिजे की कम्युनिस्टांसारखी गरिबी हे दोनच पर्याय लोकांसमोर आहेत. जो बायडेन निवडणूक जिंकले तर सगळ्या कम्युनिस्टांचा फायदा होईल आणि देश मंदीच्या खाईत लोटला जाईल. ट्रम्प यांना 1 ऑक्टोबरला कोरोनाचं निदान झालं होतं. त्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि चार दिवसांच्या उपचारानंतर ते कोरोनामुक्त झाल्याचा दावाही करण्यात आला होता. आता व्हाईट हाऊसच्या डॉक्टरांनी त्यांना निवडणुकीच्या प्रचारास सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. नासा पुन्हा चंद्रावर पाठवणार मानव, आर्टेमिस अकॉर्डमध्ये 8 देशांचा सहभाग चीनने जगाला कोरोना व्हायरस दिला आहे. चीन आक्रमकपणे पुढे येत आहे. चीनला रोखायची ताकद ही फक्त आपल्या आक्रमक धोरणांमध्ये आणि प्रशासनात आहे असा दावाही त्यांनी केला. आपले प्रतिस्पर्धी उमेदवार जो बायडेन यांच्यावरही त्यांनी टीकेची झोड उठवली. जो हे इतिहासातले सर्वात वाईट उमेदवार आहे. अशा उमेदवापाकडून पराभव स्विकारणं हे सर्वात अपमानास्पद असेल. त्याचा माझ्यावर सर्वात जास्त दबाव आहे असंही त्यांनी सांगितलं.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Donald Trump, US elections

    पुढील बातम्या