'असं पत्र तर आम्ही सहावीत लिहायचो!' ट्रम्प यांनी टर्कीच्या अध्यक्षांना असं काय लिहिलं ज्यावर सारं जग हसतंय?

'असं पत्र तर आम्ही सहावीत लिहायचो!' ट्रम्प यांनी टर्कीच्या अध्यक्षांना असं काय लिहिलं ज्यावर सारं जग हसतंय?

'मूर्खासारखं वागू नका!' अशा भाषेतलं हे पत्र खरंच डोनल्ड ट्रम्प यांनी टर्कीच्या अध्यक्षांना लिहिलंय हे स्पष्ट होताच सोशल मीडियावर ट्रम्प यांची खिल्ली उडवली जात आहे.

  • Share this:

मुंबई, 18 ऑक्टोबर : 'मूर्खासारखं वागू नका, तुमचे काही प्रश्न सोडवण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. त्यावर पाणी फिरवू नका. चिवट माणसारखे वागू नका' ही भाषा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी (US president) त्यांच्या सहीने लिहिलेल्या 'औपचारिक' पत्रात तेही दुसऱ्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना उद्देशून वापरली, हे सांगून खरं वाटेल का? Don't be a tough guy.... Don't be fool! असं कुठल्याही औपचारिक संवादात कुणी म्हणू शकेल असं आपल्याला वाटत नसलं तरी डोनल्ड ट्रम्प यांनी याच भाषेत तुर्कस्तानचे (Turkey) प्रमुख एर्दोगन (Recep Tayyip Erdoğan ) यांना पत्र लिहिलं आहे. अमेरिकेच्याच एका वृत्तरपत्राने हे पत्र छापलं आणि जगभरात सोशल मीडियावर एकच कल्लोळ उठला. हे असं पत्र तर आम्ही सहावीत लिहायचो, इथपासून ते हे फारसच लाजिरवाणं आहे पर्यंत अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एकाने तर लहान मुलांच्या अक्षरात हे पत्र लिहून घेतलं आणि तेही सोशल मीडियावर विशेषतः Twitter वर व्हायरल झालं.

सुरुवातीला हे पत्र खरंच ट्रम्प यांच्या कार्यालयातून दिलं गेलं आहे का यावर शंका व्यक्त करण्यात आली. पण व्हाइट हाऊस (White House) कडून याला दुजोरा मिळाल्यावर तर सोशल मीडियावर मीम्सना ऊत आला. ट्रम्प यांनी लिहिलेलं पत्र सगळीकडे व्हायरल झालं आहे.

Let's work out a good deal अशा अनौपचारिक वाक्याने या पत्राची सुरुवात झाली आहे. बोली भाषेत मित्राशी बोलताना अशी इंग्रजी वापरली जाते. राजनैतिक चर्चांमध्ये बोलतानाही ही भाषा वापरली जात नाही. इथे पत्रात लिखित स्वरूपात ही अनौपचारिक आणि थेट भाषा वापरल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

एखाद्या किशोरवयीन मुलाने त्याच्या शाळेतल्या विरोधकाला लिहिलेलं हे पत्र वाटतंय...

'मी तुम्हाला नंतर फोन करतो.' या वाक्याने या पत्राचा शेवट करण्यात आला आहे. खाली डोनल्ड ट्रम्प यांची त्रिकोणी लफ्फेदार (?) सहीसुद्धा आहे. रंगीत पेन्सिलीनं लिहायचं बाकी आहे, असंही एका यूजरनं म्हटलंय.

या पत्रावर तुर्कस्तानच्या अध्यक्षांची प्रतिक्रिया BBC ने जाणून घेतली. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, आम्ही या पत्राला तातडीने कचऱ्याची टोपली दाखवली, असं टर्कीकडून सांगण्यात आलं आहे. अमेरिकेच्या पत्रानंतर जराही न थांबता टर्कीने सीरियावर हल्ले सुरू केले. त्यावरूनच या पत्रावरची प्रतिक्रिया जगाला समजली होती. पण आता या पत्रातला मजकूर आणि त्याची भाषा उघड झाल्यावर चर्चा सुरू आहे. राजनैतिक विषयांवरच्या औपचारिक पत्रामध्ये अशी भाषा वापरावी का याविषयी आता चर्चाचर्वण सुरू आहे.

फॉक्स बिझनेस या अमेरिकन वृत्तसंस्थेनं प्रथम हे पत्र प्रकाशित केलं आणि त्यानंतर खळबळ उडाली.

---------------------------

इतर बातम्या

Indian Idol च्या ऑडिशनमध्ये स्पर्धकानं नेहा कक्करला जबरदस्तीनं KISS केलं आणि...

200 कोटींचा 'एकटा' मालक.., मृत्यूनंतर पोलिसांना शोधावा लागला 'वारस'

सोशल मीडियावरील ट्रोलिंगची शिकार झाली पॉप स्टार, राहत्या घरी केली आत्महत्या

इथे राहणारे लोक खाऊ शकणार नाहीत Dominos पिझ्झा, कंपनीने घेतला मोठा निर्णय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2019 04:07 PM IST

ताज्या बातम्या