अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतभेटीला, पंतप्रधानांसोबत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतभेटीला, पंतप्रधानांसोबत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी भारतात येणार आहेत

  • Share this:

वॉशिंग्टन, 11 फेब्रुवारी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारी दरम्यान भारत दौर्‍यावर येणार आहेत. व्हाईट हाऊसने मंगळवारी ट्विटरच्या माध्यमातून याची घोषणा केली. व्हाईट हाऊसने ट्विटमध्ये म्हटले आहे की, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी भारतात येणार आहेत. या भेटीमुळे अमेरिका-भारत सामरिक भागीदारी आणखी मजबूत होईल आणि अमेरिकन आणि भारतीय लोकांमधील कायमस्वरुपी संबंध अधिक मजबूत होतील.

16 जानेवारी रोजी परराष्ट्र खात्याने सांगितले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रस्तावित भेटीसंदर्भात मुत्सद्दी मार्गांद्वारे भारत आणि अमेरिका संपर्कात होते. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी नवी दिल्ली येथे एका संमेलनादरम्यान सांगितले की "अनेक महिन्यांपासून अशी अटकळ बांधली जात आहे ... पंतप्रधान मोदींनी जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेतली तेव्हा त्यांना भारतात आमंत्रित केले होते. दोन्ही देश आमच्याशी संपर्क साधत आहे. जेव्हा आम्हाला ठोस माहिती मिळेल तेव्हा ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. "

गेल्या सप्टेंबर महिन्यात ह्य़ुस्टनमध्ये ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमात ट्रम्प यांच्यासोबत एकाच व्यासपीठात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावेळी मोदींनी ट्रम्प यांनी ट्रम्प यांच्या परिवाराला आमंत्रित केले होते. ते म्हणाले होते, की त्यांचा भारत दौरा दोन्ही देशांच्या सामायिक स्वप्नांना एक नव्या उंचीवर घेऊन जाईल.

First published: February 11, 2020, 7:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading