न्यूयॉर्क, 29 सप्टेंबर : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald trump) यांनी अमेरिकेपेक्षा भारतात जास्त कर (income tax) भरल्याचं वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेत 750 डॉलर्सचा कर भरला पण भारतात झालेल्या एका रिअल इस्टेटच्या करारामध्ये ट्रम्प यांना तब्बल 1,45,400 डॉलर्सचा कर भरावा लागल्याची माहिती न्यूयॉर्क टाइम्सने दिली आह
अमेरिकेच्या अध्यक्षांनी मात्र ही बातमी खोटी असल्याचं सांगितलं आहे. भारतातील नियमांप्रमाणे त्यांनी कर भरला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016 साली अध्यक्षपदाची निवडणूक (presidential election) जिंकली होती. त्यावेळी त्यांना 750 डॉलर्सचा कर भरावा लागल्याची माहिती न्यूयॉर्क टाइम्सने दिली. अशीही माहिती आहे की, गेल्या 15 वर्षांमध्ये 10 वर्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेत करच भरावा लागलेला नाही कारण त्यांच्या मिळकतीपेक्षा त्यांचा खर्च अधिक दाखवण्यात आला आहे.
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी (presidential election 2020) अमेरिकेत मंगळवारी प्रेसिडेन्शिअल डिबेट होते आहे. त्यातच न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या या बातमीमुळे चांगलीच खळबळ माजली आहे. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर ट्रम्प यांना तातडीने पत्रकार परिषद घ्यावी लागली. त्यात ट्रम्प यांनी योग्य तेवढा करभरणा केल्याचं नमूद केलं आहे.
ट्रम्प यांच्या कंपनीचे प्रवक्ते अॅलन गार्टन यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, न्यूयॉर्क टाइम्सचं वृत्त तद्दन खोटं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी वैयक्तिक उत्पन्नातून कोट्यवधी डॉलर्सचा कर सरकारला दिला आहे. इतकंच नाही तर ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर सुद्धा त्यांनी योग्य तो करभरणा केला आहे. एकीकडे अमेरिकेत निवडणुकीचे वारे घोंगावत असताना ट्रम्प यांच्या कर भरण्याबाबत न्यूयॉर्क टाइम्सने उपस्थित केलेली शंका ट्रम्प यांना पुढे संकटात तर टाकणार नाही ना हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Published by:Amruta Abhyankar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.