पृथ्वीवर खरच आले होते एलियन्स? 15 वर्षांनंतर पेंटागॉननं प्रसिद्ध केले UFOचे VIDEO

पृथ्वीवर खरच आले होते एलियन्स? 15 वर्षांनंतर पेंटागॉननं प्रसिद्ध केले UFOचे VIDEO

याआधी UFO दिसणारे हे व्हिडीओ 2007 आणि 2017मध्ये अनधिकृतपणे व्हिडीओ प्रसिद्ध केले होते.

  • Share this:

न्यूयॉर्क, 28 एप्रिल : एलियन्स हे आजही एक गुढ आहे. जगभरातील शास्त्रज्ञ गेली कित्येक वर्ष एलियन्स आणि UFO (Unidentified Flying Object) म्हणजे परग्रह वासियांचे यान याचा शोध घेत आहेत. त्यामुळं पृथ्वीच्या बाहेर खरंच कोणत्या ग्रहावर जीवन आहे का? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. मात्र तब्बल शेकडो वर्षांनी पहिल्यांदाच एलियन्स पृथ्वीवर आल्याची शक्यता वर्तवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे.

अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पेंटागॉनने गुप्त यादीतून तीन व्हिडीओ प्रसिद्ध केले आहेत. या व्हिडीओमुळं पुन्हा एकदा एलियन्स असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या व्हिडीओंमध्ये UFO दिसत आहे. हा व्हिडीओ अमेरिकन नेव्हीच्या वैमानिकांच्या कॅमेऱ्यातून टिपला गेला आहे.

वाचा-...तर येत्या 24 तासांत होणार जगाचा अंत? नासाने सांगितलं काय आहे सत्य

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने (DOD) म्हटले आहे की, हे तिन्ही व्हिडीओ प्रसिद्ध करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. यापैकी एकाला नोव्हेंबर 2004 मध्ये अटक करण्यात आली होती तर इतर दोघांना जानेवारी 2015मध्ये. यांनी 2007 आणि 2017 मध्ये अनधिकृतपणे व्हिडीओ प्रसिद्ध केले होते. संरक्षण खात्याने एका निवेदनात म्हटले आहे की, "लोकांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी हा खरा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. असे बरेच व्हिडीओ व्हायरल होत आहेत. दरम्यान व्हिडीओमध्ये दिसत असलेली वस्तू 'अज्ञात' श्रेणीमध्ये आहे. संशोधक याचा तपास करतील."

वाचा-जगातील सर्वात लहान देशाचा राजा चालवतो रेस्टॉरंट,'या' देशात राहतात केवळ 11 नागरिक

वाचा-थरारक VIDEO: …आणि 15 सेकंदात घरावर कोसळला BSNL चा टॉवर, पावसानेही झोडपलं

निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, “सखोल आढावा घेतल्यानंतर विभागाने असे निश्चित केले की हे व्हिडीओ प्रसिद्ध केल्यानंतर कोणतीही संवेदनशील माहिती पसरणार नाही.”. दरम्यान हे व्हिडीओ टिपणाऱ्या वैमानिकांना आजही रात्रीची झोप लागत नाही.

एका मिनिटात 60 मैल अंतर कापते UFO

2004 मध्ये पॅसिफिकमध्ये ही घटना घडली. नेव्हीच्या क्रूझर पायलटने न्यूयॉर्क टाईम्सला सांगितले की, "ते एवढ्या वेगात होते, मी असे कधीच काही पाहिले नाही". क्रूच्या मते, सुमारे 40 फूट लांबीची ही वस्तू प्रथम पाण्यावर फिरत होती आणि नंतर वेगात निघून गेली. यानंतर, अंदाजे 60 मैलांवर असलेल्या दुसऱ्या जहाजातील वैमानिकांनाही UFO पाहिल्याचे सांगितले. एका पायलटच्या मते, या अज्ञाच वस्तूने एका मिनिटात 60 मैलांचे अंतर कापले.

संपादन, संकलन-प्रियांका गावडे.

First published: April 28, 2020, 3:14 PM IST
Tags: nasaufo

ताज्या बातम्या