अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातल्या राजदूत निक्की हेलींचा राजीनामा, ट्रम्प करणार खुलासा!

अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातल्या राजदूत निक्की हेलींचा राजीनामा, ट्रम्प करणार खुलासा!

  • Share this:

वॉश्गिंटन,ता.9 ऑक्टोबर :  अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातल्या राजदूत निक्की हेली यांनी राजीनामा दिलाय. हेली यांच्या राजानीम्यामुळं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हेली यांचा राजीनामा मंजूर केलाय. त्यांच्या राजीनाम्याचं कारण अजुन बाहेर आलेलं नाही. तर अध्यक्ष ट्रम्प याबाबत बुधवारी मोठी घोषणा करणार आहेत. ट्रम्प यांनीच ट्विटरवरून तशी घोषणा केलीय. बुधवारी ओव्हल ऑफिसमध्ये माझी सहकारी निकी हेली हिच्यासोबत मी मोठी घोषणा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हेली यांची कारकिर्दी उत्तम राहिली त्यांनी चांगलं काम केलं असं कौतुकही ट्रम्प यांनी केलं आहे. हेली या 2020 ची निवडणुक लढणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र ANI ने दिलेल्या वृत्तनुसार त्या निवडणुक लढवणार नाहीत तर ट्रम्प यांच्यासाठी प्रचार करणार आहेत.

हेली या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक आहेत.  पंजाबमधल्या शिख कुटूंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडिल अंबाला इथून अमेरिकेत कामानिमित्त गेले आणि तिथेच स्थायिक झाले. या आधी त्या कॅरोलिनाच्या गव्हर्नर होत्या. ट्रम्प यांच्या विश्वासू सहकाऱ्यांमध्ये त्याची गणना होते. या आधी ट्रम्प यांच्या अनेक सहकाऱ्यांनी राजीनामे दिले असल्याने हेली यांच्या राजीनाम्याबाबतही अनेक शंका व्यक्त करण्यात येत होत्या.

मात्र खुद्द ट्रम्प यांनीच त्याबाबत ट्विट केल्याने सर्व शंकांना विराम मिळालाय. ट्रम्प काय घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 9, 2018 10:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading