Home /News /videsh /

अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार Covid पॉझिटिव्ह

अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार Covid पॉझिटिव्ह

अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे..आता येथील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना लागण झाली आहे

    वॉशिंग्टन, 27 जुलै : जगभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यातही अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या जास्त असून मृत्यूचा आकडा भीती वाढवणारा आहे. यातही एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांना कोरोनाची लागण झाली आहे. रॉबर्ट ओब्रीन (Robert O'Brien)  यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. दरम्यान जगभरात 1 कोटी 59 लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील तब्बल 42 हजार 50 रुग्ण हे अमेरिकेतील आहे. अमेरिकेत कोरोनानं थैमान घातले आहे. कोरोनामुळे आतापर्यंत अमेरिकेत 1 लाख 48 हजारहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. या सगळ्यात अमेरिकेत आता आणखी एक आजार वेगाने पसरत आहे. अमेरिकेतील 11 राज्यांतील 640हून अधिक लोकांना सायक्सोस्पोरा (cyclospora) नावाचा आजार झाला आहे. हे वाचा-मोठी बातमी! चीनला जबरदस्त झटका, भारत सरकारने आणखी 47 चिनी अ‍ॅप्स केले बॅन सायक्सोस्पोरा हा आजार पॅकेटमध्ये विकल्या जाणाऱ्या सॅलडमुळे होतो. पॅकेट सॅलडमध्ये आइसबर्ग लेटस, गोभी आणि गाजर असतात. हे सॅलड खाल्यानंतर तब्बल 641 जणांना या विचित्र आजाराची लागण झाली आहे. यातील 37 जणांना रुग्णालयात दाखलही करण्यात आले आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या