मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

'राष्ट्रपती भवनातच पाकच्या माजी गृहमंत्र्यांनी माझ्यावर बलात्कार केला', महिला पत्रकाराचा धक्कादायक VIDEO VIRAL

'राष्ट्रपती भवनातच पाकच्या माजी गृहमंत्र्यांनी माझ्यावर बलात्कार केला', महिला पत्रकाराचा धक्कादायक VIDEO VIRAL

2011मध्ये राष्ट्रपती भवनातच माझा बलात्कार केल्याचं एका व्हिडीओच्या माध्यमातून या महिला पत्रकारानं सांगितलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
इस्लामाबाद, 06 जून : एकीकडे पाकिस्तान सध्या कोरोना, उपासमारी यासगळ्या संकटांशी सामना करत आहे. यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे पाकिस्तानचे (Pakistan) माजी गृहमंत्री रहमान मलिक (Rehman Malik) यांच्यावर महिला पत्रकारानं बलात्काराचा आरोप केला आहे. हा आरोप स्वत: या महिला पत्रकारनं ट्वीट केला. महिला पत्रकार सिंथिया डी रिचीनं (Cynthia D. Ritchie) ट्वीट करत पाकचे माजी गृहमंत्री रहमान मलिक यांनी 2011मध्ये राष्ट्रपती भवनातच माझा बलात्कार केल्याचं एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सिंथिया दिलेल्या माहितीनुसार, "जेव्हा माझा रेप झाला तेव्हा त्यावेळी राष्ट्रपती भवनमध्ये माजी पंतप्रधान यूसुफ रजा गिलानीही उपस्थित होते. त्यांनीही माझ्या अपमान केला होता". सिंथिंयानं सांगितले की, "2011मध्ये पाकमधील एका कार्यक्रमात राष्ट्रपती भवनात बोलवले होते. मला वाटलं की व्हिजाबाबत बोलणी होणार आहे. मात्र माझं बुके देऊन स्वागत करण्यात आलं. त्यानंतर मला ड्रग्ज असलेलं पेय देण्यात आलं. जेव्हा हा सगळा प्रकार घडला तेव्हा पीपीपी सरकार होती, त्यामुळं मी तक्रार करणार कोणाकडे?". सिंथियानं केलेल्या आरोपानंतर पीपीपी सरकार आणि रहमान मलिक हादरले आहेत. पाकिस्तानी पत्रकार गुलाम अब्बास शाह यांनीही सिंथियाचा एक व्हिडीओ ट्वीट केला. यात सिंथिया राष्ट्रपती भवनात आपल्यासोबत काय काय झालं, याबाबत सांगत आहे. सिथिंयाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक युझरनं तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. काहींनी या घटनेबाबब तेव्हाच का नाही वाचा फोडली, असे विचारले असता तिनं त्यावेळी पाकमध्ये पीपीपी सरकार होतं. त्यामुळं सांगूनही काही झालं नसतं, असं सांगितले. अमेरिकन दूतावासाला माहिती दिली होती सिंथियानं सांगितले की, '2011मध्ये मी अमेरिकन दूतावासातील एका व्यक्तीला याबाबत माहिती दिली होती. त्यावेळी कठीण परिस्थिती होती. अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधामुळं मला मदत मिळाली नाही. मी सध्या पाकिस्तानमधील एका खास व्यक्तीसोबत आहे, त्यांनी मला याविषयावर बोलण्यासाछी प्रोत्साहित केले.
First published:

पुढील बातम्या