अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्यासाठी अमेरिका, फ्रान्सकडून चीनची मनधरणी

अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्यासाठी अमेरिका, फ्रान्सकडून चीनची मनधरणी

मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवले जाईल, भारताला वाटते आशा

  • Share this:

न्यूयॉर्क, 16 मार्च : जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताने कंबर कसली आहेत. चीनच्या आडमुठ्या भूमिकेविरोधात आता भारताने दबावतंत्र वापरण्यास सुरूवात केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघातील मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यासाठी चीनने समर्थन द्यावे यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे स्थायी सदस्य असलेल्या अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने चर्चो सुरू केली आहे.

अमेरिक, फ्रान्स या देशांच्या प्रयत्नानंतरही अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करता आले नाही तर यावर खुल्या चर्चेचा प्रस्ताव ठेवण्याची शक्यता आहे.

भारताच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेत समितीसोबत मसूदला जागतिक दहशतवादी घोषित करण्याबाबत चर्चा करत असल्याचे समजते. भारत या प्रकरणी जितका शक्य होईल तितका संयम बाळगणार असून यात मसूदला जागतिक दहशतवादी घोषित केले जाईल अशी आशा भारताला वाटते. चीनला पाकिस्तानसोबत अनेक मुद्द्यांवर चर्चा करावी लागेल. मात्र आपल्याला 14 देशांचे समर्थन आहे.

संयुक्त राष्ट्रसंघात मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावावर चीनने नकाराधिकाराचा वापर केला होता. चीनने असा प्रकार पहिल्यांदाच केलेला नाही. याआधी चारवेळा चीनने नकाराधिकार वापरला आहे. हा प्रस्ताव अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन या देशांनी ठेवला होता. भारताने चीनच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. तसेच प्रस्ताव सादर करणाऱ्या देशांनी आम्ही इतर पर्याय वापरू असा इशाराही दिला आहे.

गेल्या 50 तासांपासून प्रस्ताव सादर करणारे तीनही देश चीनसोबत सामंजस्याने चर्चा करत आहेत. ही एक तडजोड असल्याचं म्हटलं जात आहे. यातून कदाचित मसूद अझहरला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत जागतिक दहशतवादी घोषित केलंच तर त्याबाबतची घोषणा करताना चीनला पटेल अशी भाषा वापरावी लागेल असंही म्हटलं जात आहे.

First published: March 16, 2019, 2:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading