मराठी बातम्या /बातम्या /विदेश /अफगाणिस्तानातून रात्रीच्या अंधारात अमेरिकी सैन्याचं पलायन, बगराम एअरबेसच्या नव्या कमांडरचा दावा

अफगाणिस्तानातून रात्रीच्या अंधारात अमेरिकी सैन्याचं पलायन, बगराम एअरबेसच्या नव्या कमांडरचा दावा

गुरुवारी सायंकाळी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात शेकडो लोकांचा हकनाक बळी गेला आहे.

गुरुवारी सायंकाळी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात शेकडो लोकांचा हकनाक बळी गेला आहे.

अमेरिकेनं (USA) अफगाणिस्तानातून (Afghanistan) आपलं सैन्य (US Army) माघारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं तब्बल 20 वर्षांनंतर अफगाणिस्तानातल्या बगराम लढाऊ एअरफील्डवरील (Bagram Airfield) अमेरिकन सैन्याचं वास्तव्य संपलं आहे.

    नवी दिल्ली, 07 जुलै: अमेरिकेनं (USA) अफगाणिस्तानातून (Afghanistan) आपलं सैन्य (US Army) माघारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं तब्बल 20 वर्षांनंतर अफगाणिस्तानातल्या बगराम लढाऊ एअरफील्डवरील (Bagram Airfield) अमेरिकन सैन्याचं वास्तव्य संपलं आहे. मात्र अमेरिकेच्या सैन्यानं रात्रीच्या अंधारात गुपचूप या विमानतळावरून गाशा गुंडाळल्यानं सर्वत्र त्यांच्या या अगम्य कृतीबद्दल चर्चा रंगली आहे. अफगाण लष्करी अधिकाऱ्याच्या मते, अमेरिकन सैन्य रात्री इथले सर्व दिवे बंद करून अंधारात गुपचूप निघून गेलं. आपण निघून जात असल्याची खबरही त्यांनी कोणाला लागू दिली नाही. अमेरिकेचं सैन्य निघून गेल्यानंतर दोन तासांनी नवीन अफगाण कमांडरला याबाबत माहिती मिळाली.

    अफगाण सैन्यानं सोमवारी बगराम एयरफील्ड पहिल्यांदा जगासमोर आणलं. त्यामुळं प्रथमच जगानं तालिबान (Taliban) आणि अल कायदाच्या (Al Qaeda) दहशतवाद्यांविरूद्ध (Terrorist) अमेरिकेच्या युद्ध मोहिमेचे केंद्र प्रत्यक्षात पाहिलं. अमेरिकेनं शुक्रवारी अफगाणिस्तानातला सर्वात मोठा हवाईतळ रिकामा केल्याची घोषणा केली. मात्र अमेरिकन सैन्याच्या माघारीचा कार्यक्रम ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल, असं पेंटागॉननं (Pentagon) म्हटलं आहे. बगरामचे नवे कमांडर जनरल मीर असदुल्लाह कोहिस्तानी म्हणाले की, अमेरिकेनं बगराम सोडल्याची बातमी आम्ही सकाळी सातच्या सुमारास ऐकली; पण नंतर आम्हाला समजले की अमेरिकन सैन्य आधीच निघून गेलं आहे.'

    हे वाचा-थेट घरात घुसून केली राष्ट्राध्यक्षांची हत्या; जग हादरवणारी घटना

    कोणतीही पूर्व सूचना न देता अमेरिकनं हा तळ सोडल्याच्या अफगाण सैन्याच्या तक्रारीवर अमेरिकन सैन्य दलाचे प्रवक्ते कर्नल सोनी लेगेट यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. एप्रिलच्या मध्याला अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानातून अमेरिकेचे सैन्य माघारी घेण्याची घोषणा केली होती, त्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबत अफगाण नेत्यांशी चर्चा झाली आहे, असं लेगेट यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे. अफगाण सैन्याने बगराम हवाईतळ ताब्यात घेण्यापूर्वी स्थानिक दरोडेखोरांनी इथं हल्ला करून लुटालूट केली. काबूलहून बगराम हवाईतळावर येण्यास एक तास लागतो.

    अमेरिकेचा एक सैनिक अब्दुल रऊफ यानं सांगितलं की, पहिल्यांदा आम्हाला वाटलं की तालिबाननंच ताबा मिळवला आहे. रऊफच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन सैनिकांनी काबुल विमानतळावर पोहोचल्यानंतर अफगाण सैन्याला आपण बगराम हवाईतळ सोडल्याची खबर दिली. दरम्यान, अफगाणिस्तानाच्या मोठ्या भागावर तालिबानांचा ताबा असूनही अफगाण राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण दल बगराम हवाईतळ आपल्या ताब्यात ठेवण्यास सक्षम असल्याचं कोहिस्तानी यांनी म्हटलं आहे. बगराम इथं 5 हजार कैद्यांची क्षमता असलेला एक तुरुंग असून, तिथं मोठ्या प्रमाणात तालिबानी कैदी आहेत.

    बगराम इथं एकेकाळी अमेरिकेचे दहा लाख सैनिक होते आणि हे अमेरिकेच्या तालिबानविरूद्ध लढाईचं मुख्य केंद्र होतं. परंतु जेव्हा अफगाणिस्तान सोडण्याची वेळ आली तेव्हा अमेरिकन सैनिकांनी हवाई तळाच्या बाहेर पहारा देणाऱ्या अफगाण सैनिकांना याबद्दल सांगितलं देखील नाही.

    हे वाचा-Russia Plane Crash: 28 प्रवाशांसह विमान झालं गायब; अपघातामागे ‘हे’ कारण?

    याबाबत अफगाणी सैनिक नईमतुल्ला म्हणाले, अमेरिकन सैनिकांनी 20 वर्षांमध्ये मिळवलेला आदर एका रात्रीत गमावला आहे. हेलमंड आणि कंधार इथं तालिबानविरूद्ध लढा देणारे रऊफ म्हणाले की, अमेरिकेच्या सैन्यानं बगराम सोडल्याच्या 20 मिनिटांनंतर इथली वीज बंद करण्यात आली होती इथं सर्वत्र अंधार करण्यात आला होता. जणू दरोडेखोरांसाठी तो एक संकेत होता. या तळाच्या उत्तरेकडून दरोडेखोरांनी इथं प्रवेश केला आणि सगळे अडथळे मोडून काढत त्यांनी इथल्या इमारतीत धुमाकूळ घातला. मिळेल ते सगळं लुटून नेलं. अमेरिकन सैन्य निघून गेल्यापासून अफगाण सैनिक इथला बाटल्या, कॅन्सचा कचरा साफ करीत आहेत.

    अफगाणिस्तानचे जनरल कोहिस्तानी म्हणाले की, अफगाणिस्तानात 20 वर्षे तैनात असलेल्या अमेरिकन आणि नाटो सैन्याचं कौतुक केलं पाहिजे. आता अफगाणांनी स्वत: नियंत्रण मिळवण्याची वेळ आली आहे. आपल्याला आपल्या समस्या स्वतःच सोडवावी लागेल. आपणच आपल्या देशाचं रक्षण केलं पाहिजे आणि आपल्या हातांनी आपला देश घडवला पाहिजे.’

    First published:
    top videos

      Tags: Army, USA