वॉशिंग्टन 05 नोव्हेंबर: अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीची (US Presidential election 2020 ) मतमोजणी (us election results) आता निर्याणटक टप्प्यात पोहोचली आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे पराभवाच्या छायेत आहेत तर जो बायडन (joe biden) विजयाच्या जवळ पोहोचले आहे. बायडन यांनी मिळवलेली आघाडी कमी करणं हे ट्रम्प यांच्यासाठी अशक्य मानलं जात आहे. पराभव दिसत असल्याने ट्रम्प यांनी आकांडतांडव करण्यास सुरूवात केली आहे. आपण सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो असा इशारा त्यांनी दिलाय. पराभव झाला तर ट्रम्प हे White Houseन सोडण्याची दादागिरी करण्याचा निर्णयही घेऊ शकतात. त्यांनी पदच सोडलं नाही तर काय होणार याची चर्चा आता अमेरिकेत होत आहे.
ट्रम्प हे पराभव सहजासहजी स्वीकार करणार नाही अशी शक्यता आहे. आत्ताच त्यांनी मतदानात घोळ झाल्याचा आरोप करत कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. ई-मेल आणि टपाल मतदानात फ्रॉड झाल्याचा त्यांचा आरोप आहे. त्याविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे कदाचित ते व्हाईट हाऊस सोडणार नाहीत असंही बोललं जातंय.
कोर्टाची लढाई त्याचबरोबर त्यांनी अध्यक्षांचं अधिकृत निवासस्थान असलेलं व्हाईट हाऊस सोडलं नाही तर काय होणार याची चर्चा सुरू झालीय.
ट्रम्प-बायडनची लढतीत श्वान चर्चेत; 13 हजार मतांनी मारली बाजी
अमेरिकेच्या घटनेत अशा परिस्थितीत काय करावं याचा उल्लेख नाही. मात्र असा परिस्थितीमध्ये नवनिर्वाचित राष्ट्रपती हे ‘सिक्रेट सर्व्हिस’ विभागाला निर्देश देऊन व्हाईट हाऊस खाली करून घेऊ शकतात असं सांगितलं जात आहे.
जो बायडन यांनी ट्वीट करून विश्वास ठेवा आम्ही जिंकू असं समर्थकांना आश्वस्त केलं आहे. विजयाच्या अगदी जवळ आल्यानंतर बायडन यांनी ट्वीट करून आपल्या समर्थकांना आश्वासन दिले. तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडन आणि त्यांच्या पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. पेन्सिल्वेनियामधून 5 लाख मतं गायब झाल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
US Election 2020 : बायडन यांचे झाले 'वेलडन' काम, ट्रम्प यांच्यावर पराभवाचे ढग!
मतमोजणीत अनेक ठिकाणी गैर प्रकार सुरू आहे, असा गंभीर आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला असून सर्वोच्च न्यायालयात जाण्याची घोषणा केली आहे. तर बायडन यांनी सुद्धा कोर्टात जाण्याची तयारी केली आहे. अजूनही मतमोजणी सुरू असून बायडन आणि ट्रम्प यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्षाला पूर्ण बहुमत गाठण्यासाठी 270 जागांची गरज आहे.