Home /News /videsh /

जो बायडन यांचं भारतीयांना गिफ्ट; 5 लाख लोकांना नागरिकत्व मिळण्याची शक्यता

जो बायडन यांचं भारतीयांना गिफ्ट; 5 लाख लोकांना नागरिकत्व मिळण्याची शक्यता

जो बायडन (Joe Biden) यांच्या विजयामुळे अनिवासी भारतीयांचं अमेरिकेत राहण्याचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    वॉशिंग्टन, 08 नोव्हेंबर : निवडणूक जिंकताच जो बायडन यांनी अमेरिकेत राहू इच्छिणाऱ्या अनिवासी भारतीयांना मोठं गिफ्ट दिलं आहे. जगभरातील 1.10 कोटी अनिवासी लोकांना अमेरिकेचं नागरिकत्व देण्याचा आरखडा तयार करण्यात येणार आहे. यामध्ये 5 लाखापेक्षा जास्त भारतीय नागरिक आहेत. दरवर्षी सुमारे 95 हजार लोकांना अमेरिकेचं नागरिकत्व देण्यात येतं. ट्रम्प यांच्या काळात बाहेरील देशातील नागरिकांसाठी अतिशय कडक नियम होते. त्यामुळे बऱ्याच जणांना अमेरिकेत राहण्याचं स्वप्न भंगणार की काय असा प्रश्न सतावत होता. जो बायडन (Joe Biden) यांची निवड एच -1 बी (H-1B Visa) व्हिसाधारकांसाठी चांगली बातमी असू शकते. खरं तर, बायडन अमेरिकेत H-1B व्हिसाधारकांसह High-Skilled Visa संख्या वाढविण्याची योजना आखत आहे. जर बायडन प्रशासनाने असे पाऊल उचलले तर अमेरिकेतील हजारो भारतीय व्यावसायिकांना त्याचा फायदा होऊ शकेल. बायडन कॅम्पेन डॉक्युमेंटनुसार (Biden Policy Document), अमेरिकेत राहणाऱ्या लोकांकडून High-Skilled Visa तात्पुरता घेतला जाऊ नये. जर इमिग्रेशन सिस्टम एंट्री लेव्हल कामगारांना प्रोत्साहन देत असेल तर याच्यामुळे अमेरिकेच्या इनोव्हेशनला धक्का बसणार आहे. 2006 मध्ये बायडन म्हणाले होते... जो बायडन अमेरिका आणि भारताचे संबंध अधिक बळकट करण्याचे प्रयत्न करतील अशी आशा सध्या व्यक्त करण्यात येत आहे. जो बायडन यांनी 2006 मध्ये एका मुलाखतीमध्ये असं प्रतिपादन केलं होतं की, '2020 पर्यंत अमेरिका आणि भारत ही दोन राष्ट्र जगातील सर्वात जवळची राष्ट्र व्हावीत अशी मला आशा आहे. यामुळे जग आधीपेक्षा जास्त सुरक्षित होईल’ जो बायडन यांच्या कार्यकाळात अनेक भारतीयांचं अमेरिकेत राहण्याचं स्वप्न पूर्ण होईल. असं चित्र निर्माण झालं आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Joe biden

    पुढील बातम्या