US Elections : अमेरिकेचे हे अध्यक्ष बायकोच्या भीतीने जायचे नाहीत घरी

US Elections : अमेरिकेचे हे अध्यक्ष बायकोच्या भीतीने जायचे नाहीत घरी

अमेरिकेचे नवे अध्यक्ष कोण हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अमेरिकन राष्ट्रध्यक्षांच्या इतिहासावर मात्र या निमित्ताने चर्चा होत आहे. अमेरिकेची सर्वांत स्वार्थी फर्स्ट लेडी म्हणून या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीचं नाव घेतलं जातं हे माहीत आहे का?

  • Share this:

वॉशिंग्टन, 6 नोव्हेंबर : अमेरिकेचे नवे अध्यक्ष कोण हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. US Election 2020 चे निकाल अजून रखडले आहेत, पण त्यानिमित्ताने अमेरिकन आजी-माजी राष्ट्राध्यक्षांविषयी चर्चा रंगली आहे. 6 नोव्हेंबर 1860 रोजी अब्राहम लिंकन अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांची गणना अमेरिकेच्या सर्वांत यशस्वी राष्ट्राध्यक्षांमध्ये केली जाते. साधेपणा व प्रामाणिकपणामुळे आजही ते लोकांच्या लक्षात आहेत. अत्यंत गरीब परिस्थितीतून ते राष्ट्राध्यक्षपदापर्यंत पोहोचले हे त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य. त्यांच्याविषयी काही रंजक आणि न ऐकलेल्या गोष्टी...

अब्राहम लिंकन जितके साधे होते तितकीच त्यांची पत्नी भांडखोर आणि स्वार्थी होती. अमेरिकन राष्ट्रध्यक्षांच्या इतिहासातील सर्वांत स्वार्थी पत्नी म्हणून लोक त्यांचं उदाहरण देतात. लिंकन यांच्या अनेक चरित्रकारांनी त्यांच्या बाबतीत लिहिताना असे लिहिले गेले की काही वेळा त्यांना पत्नीच्या हातचा मारही खायला लागला होता.

एकंदरीत लिंकनचं वैवाहिक जीवन हे फारसे चांगले नव्हतं. त्यांना आपल्या बायकोची भिती वाटायची. पत्नीला टाळण्यासाठी अनेकदा ते स्वतःच्या ऑफिस वर झोपत असे. त्यांनी आयुष्यभर बायकोचा छळ सहन केला.

मनाविरुद्ध विवाह

लिंकनने मेरी टाडबरोबर मनाविरुद्ध लग्न केलं. त्यांना हे माहित होते की त्या दोघांचे स्वभाव अगदी विरुद्ध आहेत. तरी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एकदा त्यांचा साखरपुडा तुटला सुद्धा होता परंतु मेरी ही खूपच हट्टी होती. त्यामुळे तिने ठरवलेच होते की ती लग्न करणार तर लिंकनशीच करणार. 'लिंकन द अननोन' या पुस्तकात लेखक डेल कार्नेगी लिहितात की लिंकनचा जेव्हा पहिल्यांदा साखरपुडा मोडला तेव्हा त्यांना हे माहीत होतं की यानंतर जर या मुलीशी लग्न केलं तर ते विनाशाचं कारण बनेल.

पत्नीपासून दूर राहण्यासाठी घरापासून दूर राहण्याचा प्रयत्न

मेरीशी झालेले त्यांचे लग्न यातून त्यांना कुठल्याच प्रकारचे सुख नव्हते. मेरी जितकी भांडखोर होती तितकेच ते शांत होते. पत्नीला टाळण्यासाठी त्यांनी घरापासून दूर राहण्याचा ही खुपदा प्रयत्न केला. त्यासाठी ते रात्री ऑफिसमध्येच झोपायचे.परंतु काय माहित कसा मेरीला आत्मविश्वास होता की तिचा नवरा एक ना एक दिवस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनेल.

रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीच्या वेळी त्यांच्याबद्दल कोणालाच माहीत नव्हतं.

लिंकन जेव्हा वकिली करत होते तेव्हा ते उत्तम वक्ते होते. त्यांची भाषणे ही इतरांना प्रभावित करणारी होती.‌

1860 मध्ये जेव्हा शिकागो मध्ये नव्याने स्थापन झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून लिंकन यांच्या नावाची कुठल्याच प्रकारे शक्यता नव्हती. कारण त्यावेळी लिंकन पेक्षाही अधिक चांगले उमेदवार त्या पदासाठी निवडले गेले होते. परंतु काही तासांच्या चर्चेनंतर लिंकन यांचं नाव त्या पदासाठी निवडले गेले व या निर्णयामुळे लोक आश्चर्यचकित झाले. त्यावेळी कोणीही त्यांना ओळखत नव्हतं.

सर्वाधिक निवडणुकांमध्ये पराभूत झालेले लिंकन

लोकांना असं वाटत होतं की रिपब्लिकन पक्षासाठी हे योग्य नाही परंतु नंतर नंतर त्यांच्या भाषणातद्वारे ते लोकांच्या मनापर्यंत पोहोचत होते. त्यानंतर ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांच्या आधी जीवनात आलेल्या सर्व निवडणुका ते हरले होते.‌ 1 जानेवारी 1963 रोजी त्यांनी अध्यक्षपदी असताना गुलामगिरी विरोधाच्या कायद्याच्या विधेयकावर सही केली होती.

सहकाऱ्यांना वाटायचं त्यांचा पराभव व्हावा

लिंकन यांच्या अध्यक्षपदाच्या काळत गुलामगिरीच्या प्रथेमुळे संपूर्ण अमेरिका पेटली होती. अमेरिकेचे तुकडे होतील असं सगळे उघडपणे म्हणू लागले. त्या वेळी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आणि सैन्यातील उच्चपदस्थांना लिंकन पराभूत व्हावेत असंच वाटत होतं. पण तरीही सत्यनिष्ठा आणि दृढतेने ते काम करत राहिले. गुलामगिरी प्रथा बंद झाल्यामुळे नाराज झालेल्या माथेफिरूने त्यांची हत्या केली.

परिस्थिती काही असो ते सतत कामात मग्न असायचे

लिंकन यांचं आयुष्य हे साधेपणा, प्रामाणिकपणा याचं मूर्तिमंत उदाहरण होतं. त्यांनी त्यांच्या जीवनाचा एक मोठा काळ सतत  प्रतिकूल परिस्थितीशी लढत घालवला होता. त्यानंतर सुद्धा कधीच कुठल्याही परिस्थितीत ते डगमगले नाही.

ते एक उत्तम राजकारणी होते. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य दुःख, निराशा, नैराश्यात घालवले होते तरीही त्याचा परिणाम त्यांनी कधी आपल्या कामावरती होऊ दिला नाही. ते कायम अयशस्वी व्हायचे परंतु पुढील येणाऱ्या कामात त्यांनी कधीच त्याचा प्रभाव पडू दिला नाही.

त्यांच्या हत्येच्या बातमीवर विरोधकांना सुद्धा अश्रू अनावर झाले

हा त्यांच्या जीवनाचा सर्वात मोठा विजय मानायला काही हरकत नाही कारण त्यांच्या हत्येची बातमी ऐकताच सर्वांसोबत त्यांच्या विरोधकांनाही अश्रू अनावर झाले. यानंतर हळूहळू लोकांना कळू लागले की लिंकन खरोखरच एक महान व्यक्तिमत्त्व होते. जास्त प्रमाणात विरोध सहन करून सुद्धा ते आपला मुद्दा कसा स्पष्ट करू शकतो याकडे लक्ष द्यायचे. त्यांनी आपल्या कित्येक विरोधकांना सुद्धा आपल्या बाजूने वळवले होते. लिंकनकडून या सर्व गोष्टी शिकण्यासारख्या होत्या.

वयाच्या पंधराव्या वर्षी घेतले मुळाक्षरांचे ज्ञान

लिंकन यांचा जन्म अशा एका गरीब घरात झाला होता की शिक्षणासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांना वयाच्या पंधराव्यावर्षी पहिल्यांदा मुळाक्षरांचं ज्ञान झालं. एक शिक्षक त्यांच्या गावी आले होते. त्यावेळी त्यांनी तिथेच शाळा चालवायला सुरुवात केली. मग लिंकन वाचण्या लिहिण्यास शिकू लागले. लिंकन यांनी लौकिकदृष्ट्या काहीच शिक्षण घेतलं नव्हतं.

1847 मध्ये जेव्हा त्यांनी संसदेची निवडणूक लढवण्यासाठी फॉर्म भरला तेव्हा त्यात एक प्रश्न विचारण्यात आला होता की तुमचे शिक्षण काय? तेव्हा त्यांनी एका शब्दात 'सदोष' असं उत्तर दिलं. त्यांच्या वाचनाच्या क्षमतेने त्यांच्यासमोर असे एक नवीन जादूचे जग आणून ठेवले होते याची कल्पना त्यांनी कधी केलीच नव्हती.

मजुरीपासून अनेक छोटी मोठी कामं त्यांनी केली

उधारीवर पुस्तके वाचण्यासाठी ते शेतात काम करायचे. कोर्टात वकिलांनीचं बोलणं ऐकण्यासाठी ते पायी 15-20 मैल चालत जायचे. पैशाच्या गरजेपोटी त्यांनी अनेकदा कामगार म्हणून व शेतीची कामं केली.

बायकोनी केली राष्ट्राध्यक्ष भवनाची नाचक्की

लिंकन गेल्यानंतरही त्यांचं जितकं कौतुक झालं आणि त्यांना आदर मिळाला तितकीच त्यांच्या पत्नीची बदनामी झाली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने स्वतःसाठी अधिक पैशाची मागणी केली होती. आजारपणाच्या नावाखाली त्यांनी बनावट बिल सुद्धा दिली होती व काँग्रेसकडे पैशाची मागणी केली होती. इतकंच नाही तर त्यांनी कर्जाचे कारण काढून सुद्धा पैसे मागण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना त्या कर्जातून बाहेर काढणे आणि जगण्यासाठी पैसे देणे हे अमेरिकन सरकारचे कर्तव्य होतं असं त्यांचं मत होतं. राष्ट्राध्यक्ष भवनातून बाहेर पडताना त्या तिथल्या कित्येक मौल्यवान वस्तू आपल्या सोबत घेऊन गेल्या होत्या. मेरी यांना राष्ट्रध्यक्षांच्या सर्वांत स्वार्थी पत्नी म्हणून ओळखलं जातं.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: November 6, 2020, 11:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading