अमेरिका, 05 नोव्हेंबर : अवघ्या जगाचे लक्ष्य लागून असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची (us presidential election 2020 ) मतमोजणी (us election results) आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. जो बायडन (joe biden) यांनी मात्र आता निर्णयाक आघाडी घेतली आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (donald trump) यांच्यावर पराभवाचे ढग जमा झाले आहे. परंतु, डोनाल्ड ट्रम्प यांनी मतमोजणीत गैर प्रकार झाल्याचा आरोप करून कोर्टाचे दार ठोठावणार असल्याचे जाहीर केले आहे.
आज दुसऱ्या दिवशीही अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, जॉर्जियामध्ये ट्रम्प आणि बायडन यांच्यात 23,000 मतांचा फरक आहे. एकूण 127,019 पोस्टल मतांची मोजणी पूर्ण झाली आहे.
यंदाची दिवाळी फटाक्याविना? मुंबईकरांसाठी BMC लवकरच घेणार मोठा निर्णय
सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, मतमोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जवळपास 14,000 पोस्टल मतांची मोजणी केली आहे. प्रत्येक तासाला 3,000 मतांची मोजणी सुरू आहे. आतापर्यंत कर्मचाऱ्यांनी 127,948 मतं मोजली असून आणखी 123,716 मतांची मोजणी बाकी आहे.
तर दुसरीकडे पेंसिल्वेनियामध्ये ट्रम्प हे बायडन यांच्या 164,000 मतांनी पुढे आहे. जॉर्जियामध्ये ट्रम्प जवळपास 28,000 मतांनी आघाडीवर आहे. तर एरिजोनामध्ये बायडन हे 79,000 मतांनी आघाडीवर आहे.
दरम्यान, वॉशिंग्टन पोस्टनं दिलेल्या वृत्तानुसार बायडन यांना 50.5 तर डोनाल्ड ट्रम्प यांना 48 टक्के मतं मिळाली आहे. जो बायडन यांना अमेरिकेचे पुढचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी आता केवळ 6 मतांची आवश्यकता आहे. न्यूज एजन्सी एपीच्या म्हणण्यानुसार, जो बायडन यांनी मिशिगन आणि विस्कॉन्सिन या प्रमुख स्विंग राज्यांमध्ये विजय मिळवून 264 मते मिळविली. डेमोक्रॅटिक उमेदवाराला व्हाईट हाऊसमध्ये पोहोचण्यासाठी फक्त आणखी एका राज्यात विजय मिळवणं गरजेचं आहे.
Keep faith in the process and in each other. Together, we will win this.
— Joe Biden (@JoeBiden) November 4, 2020
विजयाच्या अगदी जवळ आल्यानंतर बायडन यांनी ट्वीट करून आपल्या समर्थकांना आश्वासन दिले. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडन आणि त्यांच्या पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. पेन्सिल्वेनियामधून 5 लाख मतं गायब झाल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
'यशोमती ठाकूर यांना मंत्रिपदावरून काढल्यास उद्धव ठाकरेंना सरकार पडण्याची भीती'
मतमोजणीत अनेक ठिकाणी गैर प्रकार सुरू आहे, असा गंभीर आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला असून सर्वोच्च न्यायालयात जाण्याची घोषणा केली आहे. तर बायडन यांनी सुद्धा कोर्टात जाण्याची तयारी केली आहे. अजूनही मतमोजणी सुरू असून बायडन आणि ट्रम्प यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्षाला पूर्ण बहुमत गाठण्यासाठी 270 जागांची गरज आहे.