US Election: ठाणेदार झाले अमेरिकेतले आमदार! मराठमोळे करोडपती उद्योजक मिशिगनमधून विजयी

अमेरिकेतले प्रसिद्ध उद्योजक, संशोधक आणि करोडपती म्हणून ओळख असलेले ठाणेदार यांनी मिशिगनच्या तिसऱ्या डिस्ट्रिक्टमधून निवडणूक (US election 2020) जिंकली आहे.

अमेरिकेतले प्रसिद्ध उद्योजक, संशोधक आणि करोडपती म्हणून ओळख असलेले ठाणेदार यांनी मिशिगनच्या तिसऱ्या डिस्ट्रिक्टमधून निवडणूक (US election 2020) जिंकली आहे.

  • Share this:
    बेळगाव, 5 नोव्हेंबर : अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत (US Presidential Election 2020) जो बायडेन (Joe Biden) की डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) कोण बाजी मारणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं, तरी स्टेट्समधून निकाल यायला सुरुवात झाली आहे. मराठी माणसांना आनंद वाटेल अशी एक बातमी आली आहे मिशिगन (Michigan)स्टेटमधून. अमेरिकेच्या या राज्यातून जिंकलेल्या एका उमेदवाराचं नाव आहे श्री ठाणेदार (Shri Thanedar). अमेरिकेतले प्रसिद्ध उद्योजक, संशोधक आणि करोडपती म्हणून ओळख असलेले ठाणेदार यांनी मिशिगनच्या तिसऱ्या डिस्ट्रिक्टमधून निवडणूक जिंकली आहे. श्री ठाणेदार मूळचे बेळगावचे आहेत. ते उत्तम मराठी बोलतात. अमेरिकेत अनेक वर्षं वास्तव्य असणारे ठाणेदार मूळात शास्त्रज्ञ. त्यातून त्यांनी मोठा उद्योग उभा केला. अमेरिकेतले प्रसिद्ध करोडपती उद्योगपती म्हणून ते प्रसिद्ध आहेत. दोन वर्षांपूर्वी मिशिनगच्या गर्व्हर्नरपदासाठी त्यांचं नाव चर्चेत होतं. आता डेमोक्रॅटिक पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली होती. त्यांनी प्रतिस्पर्धी रिपब्लिकनचा पराभव करत मिशिगनच्या तिसऱ्या डिस्टिक्टमधून विजय मिळवला आहे. ठाणेदार यांनी शून्यातून विश्व उभं केलं आहे. सर्वसामाान्य कुटुंबात बेळगावात जन्म झाल्यानंतर त्यांनी केमिस्ट्रीमध्ये पदवी मिळवली. मुंबई विद्यापीठातून बॅचलर्स पदवी मिळवल्यानंतर ते उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत स्थायिक झाले. तिथेच स्थायिक होत त्यांनी संशोधन, नोकरी पुन्हा संशोधन करत स्वतःचा उद्योग सुरू केला. "गरिबांचं दुःख मी जाणतो", असं म्हणत त्यांनी बिघडलेल्या परिस्थितीला सावरण्यासाठी मतं द्या, असा प्रचार केला होता. ट्रम्प प्रशासनात अनेकांचे रोजगार गेले. त्याविरोधात ठाणेदार यांनी प्रचार मोहीम राबवली होती. निवडणूक निकालाला विलंब अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीचे (US Presidential Election 2020) निकाल अद्यापही स्पष्ट झालेले नाहीत. डोनाल्ड ट्रम्प किंवा जो बायडेन दोघांपैकी कुणालाही स्पष्ट विजय मिळणार नाही, हे त्यामुळे उघड झालंच आहे. अटीतटीचा सामना असलेली 7 राज्य काय निकाल देतात याकडे आता अमेरिकेचं लक्ष आहे. पण इथून निकाल यायला वेळ लागला आणि मतांमधला फरक फारसा नसेल तर मात्र निकाल चांगलाच रखडणार अशी चिन्हं आहेत. ट्रम्प कोर्टात जाण्याचा दावा करत आहेत, तसे ते खरंच गेले, तर कदाचित महिनाभरसुद्धा अमेरिकेचा नवा अध्यक्ष कोण होणार हे ठरू शकणार नाही.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published: