अमेरिकेत थाळ्या आणि वाद्य वाजवून जल्लोष, जो बायडन यांना पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा म्हणाले...

अमेरिकेत थाळ्या आणि वाद्य वाजवून जल्लोष, जो बायडन यांना पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा म्हणाले...

काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील कमला हॅरिस आणि जो बायडन यांचं अभिनंदन केलं आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 08 नोव्हेंबर : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल अखेर शनिवारी रात्री लागला आहे. जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा दारूण पराभव केला. बायडन यांना 284 इलेक्ट्रोल मतं मिळाली असून अमेरिकेचा 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. तर जो बायडेन यांच्याबरोबर उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेल्या कमला हॅरिस यांनी अनेक बाबतीत इतिहास घडवला आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्या कृष्णवर्णीय, महिला आणि त्यातही भारतीय वंशाच्या महिलेला हा सन्मान मिळाला आहे.

जो बायडन यांच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी अमेरिकेतील जनता रस्त्यावर उतरली आहे. टाळ्या, थाळ्या, बिगुल आणि वेगवेगळी वाद्य वाजवून हा जल्लोष साजरा केला जात आहे. काही ठिकाणी डान्स करून तर कुठे वाद्य वाजवून त्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा केला जात आहे. अमेरिकेत जो बायडन यांचा विजय मोठ्या आनंदान साजरा होत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.

निवडणूक जिंकल्यानंतर जो बायडन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा देखील दिल्या आहे. या विजयाबद्दल पंतप्रधान मोदींनी जो बिडेन आणि कमला हॅरिस यांचे अभिनंदन केलं. अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत-अमेरिकन संबंध आणखी मजबूत केले पाहिजेत. ते म्हणाले, मला तुमच्याबरोबर भारत-अमेरिका संबंध नव्या उंचीवर घेऊन जायचे आहेत.

हे वाचा-अमेरिकत पहिल्यांदा घडणार या 3 गोष्टी; कमला हॅरिस यांनी घडवला इतिहास

काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील कमला हॅरिस आणि जो बायडन यांचं अभिनंदन केलं आहे.

जो बायडन यांनी अमेरिकेतील जनतेचे एवढ्या मोठ्या संख्येनं मतांनी निवडणूक दिल्याबद्दल आभार मानले आहेत. भविष्यकाळात आमच्यासमोर कठीण आव्हाने आहेत, परंतु मी वचन देतो की मी सर्व अमेरिकन लोकांचा अध्यक्ष होईन. तत्पूर्वी बायडेन यांनी आपल्या भाषणात सांगितले होते की आम्ही साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्याच्या आपल्या योजनेवर काम सुरू करत आहोत.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 8, 2020, 8:08 AM IST

ताज्या बातम्या