पुन्हा मतमोजणी; डोनाल्ड ट्रम्प यांचे मध्यरात्री ट्वीट्स, वाचा रात्रभरात अमेरिकेच्या निवडणुकीचे अपडेट्स

पुन्हा मतमोजणी; डोनाल्ड ट्रम्प यांचे मध्यरात्री ट्वीट्स, वाचा रात्रभरात अमेरिकेच्या निवडणुकीचे अपडेट्स

US Election : डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडन यांना सुनावले, म्हणाले...

  • Share this:

वॉशिंग्टन, 07 नोव्हेंबर : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल रखडले आहेत. शुक्रवारी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बियाडन यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना डफ फाईट देत मागे टाकलं. जो बायडन विजयाच्या अगदी काही क्षण दूर असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी मतांमध्ये घोळ झाल्याचा दावा करत न्यायालयात धाव घेतली आणि त्यामुळे निकाल रखडला आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडन यांना खडे बोल सुनावले आहेत. बायडन यांनी जबरदस्तीने राष्ट्राध्यक्षपदावर आपला दावा करू नये. हा दावा मला देखील करता येऊ शकतो. आता कायदेशीर कारवाईला सुरुवात झाली आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय येईल असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.

हा वाद न्यायालयात गेल्यानंतर आता मोठा बदल झाला आहे. याचा फटका जो बायडन यांना बसणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. बायडन साधारण 1500 मतांनी पुढे असल्याचे समोर आले होते. त्यातच जॉर्जिया राज्यात पुन्हा मतमोजणी केली जाणार असल्याचे राज्याच्या सचिवांनी सांगितले आहे. जॉर्जिया राज्याच्या सचिवांनी सांगितले की निवडणुकीच्या पारदर्शकतेसाठी पुन्हा मतमोजणी केली जाणार आहे.

हे वाचा-जो बायडन विजयी झाले तरीही ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदावर राहणार?

जॉर्जिया राज्यात 16 इलेक्ट्रोरल वोट आहेत. व्हाइट हाउसपर्यंत पोहोचण्यासाठी 538 ‘इलेक्ट्रोरल कॉलेज वोट’ पैकी 270 वोट मिळणं आवश्यक आहे. आतापर्यंत बायडन यांना 264 आणि ट्रम्प यांना 213 इलेक्ट्रोरल मतं मिळाली आहेत. जर बायडन यांना जॉर्जियामध्ये विजय मिळाला तर नेवाडा वा एरिज़ोना (दोन्ही राज्यात बायडन लीडवर ) वा पेन्सिल्वेनिया येथील विजय मिळाल्यानंतर बाइडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात.

अमेरिकन निवडणुकीचे महत्त्व

अमेरिकन राष्ट्रध्यक्ष निवडणुकीकडे जगभरातील सर्वांचे लक्ष लागून असते. परंतु यावेळी सर्व लहान मोठ्या देशांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. सत्तेत कोण येणार याचा परराष्ट्र धोरणांवर खूप मोठा प्रभाव पडत असतो. चीन सध्या अनेक देशांवर दबाव आणत असून ट्रम्प आणि बायडन यांच्या निवडीमुळे या धोरणांवर मोठा प्रभाव पडणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्व जगाचे लक्ष लागून आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 7, 2020, 8:23 AM IST

ताज्या बातम्या