US Election 2020 LIVE : मोठी अपडेट! बायडेन बहुमताच्या जवळ; अध्यक्षपदासाठी हवं एक राज्य

American Election Result : निर्णायक मानल्या जात असणाऱ्या तीन राज्यांमधलं एक जो बायडन (Joe Bidden near majority) यांनी जिंकलं आहे. आता ते 270 आकड्याच्या जवळ आहेत.

American Election Result : निर्णायक मानल्या जात असणाऱ्या तीन राज्यांमधलं एक जो बायडन (Joe Bidden near majority) यांनी जिंकलं आहे. आता ते 270 आकड्याच्या जवळ आहेत.

  • Share this:
    वॉशिंग्टन, 5 नोव्हेंबर : अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीचे (US Presidential Election 2020) निकाल हळूहळू स्पष्ट होत आहेत. निर्णायक मानल्या जात असणाऱ्या तीन राज्यांमधलं एक जो बायडन (Joe Bidden near majority) यांनी जिंकलं आहे. आता ते 270 आकड्याच्या जवळ आहेत. त्यामुळे आता डोनल्ड ट्रम्प (Donald Trump)यांच्यापुढे उरलेली सगळी राज्य जिंकण्यावाचून गत्यंतर उरलेलं नाही. उलट जो बिडेन यांना आणखी एका राज्यात विजय मिळाला तर ते अध्यक्षपदावर विराजमान होऊ शकतील, अशी परिस्थिती आहे. अमेरिकेच्या या वर्षीच्या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे तीन राज्यांचा कल. विस्कॉन्सिन, मिशिगन आणि पेनसिव्हेनिया या तीन राज्यांपैकी बायडन यांनी विस्कॉन्सिन जिंकलं आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्यासाठी विजयी आघाडी आणखी अवघड झाली आहे. या विजयामुळे जो बायडन बहुमताच्या जवळ पोहोचले आहेत. त्याबरोबर ट्रम्प यांचे मतमोजणीबाबतचे आरोप आणखी वाढले आहेत. मिशिगनमध्ये मतमोजणी थांबवण्याची जोरदार मागणी ट्रम्प यांनी केली आहे. जाहीर झालेल्या इलेक्टोरल वोट्सच्या आकड्यांनुसार जो बायडेन यांच्याकडे 264 जागा आहेत. तर ट्रम्प यांच्याकडे 213 चा आकडा जमला आहे. बहुमतासाठी 270 जागा जिंकाव्या लागतात. ट्रम्प यांचे समर्थक डेट्रॉइट आणि फीनिक्स इथल्या वोटिंग सेंटरबाहेर एकत्र जमायला सुरुवात झाली आहे. फीनिक्समध्ये ट्रम्प समर्थकांनी मतमोजणी थांबवण्याची मागणी केली आहे. अजूनही काही राज्यांमधून निकाल स्पष्टपणे समोर आलेला नाही. त्यामध्ये अलास्का, अॅरिझोना, जॉर्जिया, नेवाडा, नॉर्थ केरोलिना आणि पेन्सिल्व्हानिया ही राज्य आहेत. ही सगळी राज्य ट्रम्प यांनी जिंकली तरच त्यांची अध्यक्षपदाची गरज पूर्ण होऊ शकेल. अन्यथा बायडेन यांचा विजय निश्चित आहे. पण इथून निकाल यायला वेळ लागला आणि मतांमधला फरक फारसा नसेल तर मात्र निकाल चांगलाच रखडणार अशी चिन्हं आहेत. ट्रम्प कोर्टात जाण्याचा दावा करत आहेत, तसे ते खरंच गेले, तर कदाचित महिनाभरसुद्धा अमेरिकेचा नवा अध्यक्ष कोण होणार हे ठरू शकणार नाही. अमेरिकेतले न्यायाधीश सार्वभौम, स्वायत्त नाहीत अमेरिकेतली न्यायव्यवस्था भारतीय न्यायव्यवस्थेपेक्षा वेगळी आहे. आपल्याकडे न्यायमूर्तींना सार्वभौमत्व आहे. न्यायव्यवस्था स्वायत्त आहे आणि त्याचा राजकीय पक्षांशी काहीही संबंध नाही. पण अमेरिकेत न्यायाधीशांची नेमणूक राजकीय पक्षच करतात. निवडणुकीआधीच ट्रम्प यांनी एका महत्त्वाच्या पदी महिला न्यायाधीशाची नेमणूक करून ठेवलेली आहे. म्हणूनच राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा निकाल आपल्याविरोधात जातोय हे लक्षात येताच ट्रम्प कोर्टात जाऊ शकतात. त्यांनी आधीच तसं सूतोवाच केलेलं आहे. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेलं, तर निकालाला विलंब होणार हे निश्चित. अमेरिकेच्या इतिहासात हे पहिल्यांदा झालेलं नाही अमेरिकेच्या इतिहासात हा विलंब पहिल्यांदा झालेला नाही. अगदी अलीकडच्या निवडणुकांमध्ये 2000 साली जॉर्ड बुश (धाकटे) सत्तेवर येण्यापूर्वी त्यांनाही मोठ्या संख्येने बहुमत मिळालेलं नव्हतं. तेव्हाही निकालाचं प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं होतं. त्या वेळी फ्लोरिडा स्टेटचा कौल महत्त्वाचा ठरला. आता ट्रम्पसुद्धा याच पद्धतीचा विचार करू शकतात. अमेरिकेची राज्य आणि राज्यांतर्गत कायदे खूप बलवान आहेत. त्यामुळे राज्यांच्या कौलावरच अध्यक्षाची निवड तिथे होते.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published: