Home /News /videsh /

US election 2020: ट्रम्प की बायडन? राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीआधीच ठरलं कोण जिंकणार

US election 2020: ट्रम्प की बायडन? राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीआधीच ठरलं कोण जिंकणार

या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु असून सध्याचे अध्यक्ष आणि रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या विरोधात डेमोक्रेट्सचे जो बायडन (Joe Biden) यांच्यात टक्कर होणार आहे.

    वॉशिंग्टन, 20 ऑक्टोबर : अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची (US Election 2020) निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु असून सध्याचे अध्यक्ष आणि रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या विरोधात डेमोक्रेट्सचे जो बायडन (Joe Biden) यांच्यात टक्कर होणार आहे. या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून लास वेगासमधील चर्चच्या एका पाद्र्याने ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. प्रचारादरम्यान ट्रम्प लास वेगासमधील एका चर्चमध्ये गेले होते. त्यावेळी तेथील पाद्र्याने त्यांना तुम्ही देवाच्या डोळ्यातील तारे असून दुसऱ्यांदा राष्ट्रपती बनणार आहात असं सांगितले. पहाटे साडेचार वाजता देवाने सांगितलं कोण होणार राष्ट्राध्यक्ष ट्रम्प जेव्हा या चर्चमध्ये गेले तेव्हा त्यांच तिथं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यानंतर चर्चचे सीनिअर पास्टर डेनसी गोलेट यांनी चर्चमध्ये उपस्थित असणाऱ्या लोकांना त्यांच्या देवाशी झालेल्या संवादाबद्दल सांगितलं. ते म्हणाले, ‘पहाटे साडेचार वाजता मला देवानी सांगितलं, मी ट्रम्प यांना दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष करणार आहे. त्यामुळे ट्रम्पच पुन्हा राष्ट्राध्यक्ष होतील.’ वाचा-US ELECTION च्या एक दिवस आधीच होणार मोठा धमाका! तज्ज्ञांनी जगाला केलं सावध चर्चमध्ये जायला आवडतं : ट्रम्प या प्रचारावेळी ट्रम्प यांनी चर्चमध्ये उपस्थित असलेल्या लोकांना मार्गदर्शन केलं. मला चर्चमध्ये जायला आवडतं. या ठिकाणी येणं हा माझा सन्मान आहे, असं म्हणत त्यांनी चर्चमधील दानपेटीत 20 अमेरिकी डॉलरचं दान दिलं. परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रम्प यांच्या या भेटीवेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. या गर्दीमधील अनेकांनी मास्कदेखील घातला नव्हता. वाचा-कोरोना काळात जगभरातील अर्थव्यवस्थांचं कंबरडं मोडलंय, चीनचा GDP मात्र वधारला बायडन यांच्यावर हल्ला ट्रम्प यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार जो बायडन यांच्यावर हल्ला चढवला. माझ्यासमोर असलेले काही लोक आपल्याशी असहमत आहेत. तुम्ही 3 नोव्हेंबरला बाहेर पडून त्यांना ताकद दाखवून द्या. दुसरीकडे जो बायडनदेखील जोरदार प्रचार करत असून ते डेलावेयरमधील सेंट जोसेफ ब्रांडीविनमध्ये सहभागी झाले. या ठिकाणी त्यांच्या मुलाची कबर असून त्याचे 2015 मध्ये मेंदूच्या कॅन्सरने निधन झाले होते.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Donald Trump

    पुढील बातम्या