वॉशिंग्टन 6 नोव्हेंबर : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी कोण येणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं, तरी जो बायडन (Joe Biden) यांचं पारडं जड असल्याचं आतापर्यंतच्या मतमोजणीच्या (US election 2020) आकड्यांवरून दिसतं. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यापुढे बायडन यांनी मोठी आघाडी घेतली आहे आणि आता फक्त पाच राज्यांच्या निकालावर राष्ट्राध्यक्ष ठरू शकतो. ट्रम्प यांची पत्नी मेलानिया (melania trump) यांची फर्स्ट लेडी (First lady of America) म्हणून ओळख जगाला आहेच. पण जो बायडन यांनी बाजी मारली तर मेलानिया ट्रम्प यांची जागा (Joe Biden wife) जिल बायडन घेण्याची शक्यता आहे. कोण आहेत जिल बायडेन (Jill Biden) जाणून घ्या..
जवळ जवळ 30 वर्षं शिक्षिका असलेल्या जिल यांना सर्वसामान्यांप्रमाणेच जगायला आवडतं. त्यांच्या व्हाईट हाऊसमध्ये येण्याने काय बदल होऊ शकतात ते पाहा..
पूर्णवेळ करतात नोकरी
2008 मध्ये जिल बायडन प्रथमच चर्चेत आल्या जेव्हा त्यांचे पती जो बायडन हे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष झाले. आधीपासून राजकारणात आहेत त्यांच्यासाठी जिल ह्या सर्वात विश्वासू राजकीय सल्लागार होत्या. आपण नोकरी करत राहणार हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. बायडन हे स्वतः अनेक वेळा उघडपणे याविषयी बोलले आहेत. बायडन राष्ट्राध्यक्ष झाले तर, व्हाइट हाउसमध्ये राहूनही पूर्ण वेळ नोकरी करणाऱ्या त्या इतिहासात पहिल्या फर्स्ट लेडी असतील.
69 वर्षांच्या जिल ह्या डेल्वर राज्यातील कम्युनिटी कॉलेजमध्ये शिकवतात. आपल्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे त्या विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. बायडन यांनीही निवडणूक प्रचारादरम्यान याचा उल्लेख केला होता. मतदारांशी बोलताना जो बायडन यांनी पत्नीला फर्स्ट लेडी करा, असं आवाहनदेखील केलं होतं.
Teaching is not what I do. It's who I am.
I'll be giving my convention speech tonight from my former classroom.
Brandywine High School. Room 232. pic.twitter.com/NXx1EkqVGq
— Dr. Jill Biden (@DrBiden) August 18, 2020
म्हणूनच जिल ह्या सध्या खूपच चर्चेत आहेत. न्यू जर्सी येथे जन्मलेल्या जिल यांनी आपलं बालपण पेनसिल्व्हेनियामध्ये घालवलं जिथे त्यांचे वडील एका बँकेत काम करायचे. तर त्यांची आई गृहिणी होती. शाळेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी आधी फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला पण लवकरच त्यांना त्याचा कंटाळा आला. त्यानंतर त्यांनी इंग्रजी भाषेत करिअर करण्याचा निर्णय घेतला. इंग्रजीच्या अभ्यासादरम्यान जिल यांची भेट बिल स्टिव्हनसन यांच्याशी झाली.
या भेटीनंतर त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला. त्यानंतर 1975 साली त्यांचा घटस्फोट झाला. जिल यांनी हे प्रकरण सोशल मीडिया किंवा लोकांपासून लपवलं नाही तर निवडणूक प्रचारादरम्यान त्या याबद्दल उघडपणे बोलल्या. त्यावेळी जिलना विचारण्यात आलं की तुम्ही तुटलेल्या कुटुंबाला कसं जोडून ठेवू शकता? त्यावेळी त्यांनी कॅमेऱ्यामध्ये पाहून उत्तर दिलं होतं, 'जसं आपण प्रेमाने समजुतदारपणाने एखाद्या देशाला पूर्णपणे जोडून ठेवतो तसंच.'
जो बायडन यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये आपल्या नात्याबद्दल लिहिलं आहे
ज्यावेळी जिलचा घटस्फोट झाला होता त्याच वेळी जो बायडन यांच्या पत्नीचा कार अपघातात मृत्यू झाला. त्यावेळी त्यांची जिलशी भेट झाली. बायडन यांनी आपल्या 'प्रॉमिस टू कीप' या पुस्तकात या गोष्टीचा उल्लेख केला आहे. 1977 मध्ये दोघं रिलेशनशिपमध्ये आले या काळात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते राजकीय जीवनात बरेच चढ-उतार आले पण त्या दोघांनी एकमेकांची साथ कधीच सोडली नाही.
शाळेला दिलं पहिलं प्राधान्य
अमेरिकेची सेकंड लेडी असूनही जेव्हा जिल यांनी इंग्रजी शिक्षिकेची नोकरी सोडली नाही तेव्हा त्या सर्वांमध्ये चर्चेचा विषय ठरल्या होत्या. आपले पती उपराष्ट्रपती असून सुद्धा त्या पूर्ण वेळ शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. जेव्हा त्यांच्या शाळेला सुट्टी असायची तेव्हा आपल्या पतीसोबत त्या राजकीय मोहिमेसाठी जायच्या.
माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी नो पीपल मासिकाला मुलाखत देताना विनोद केला होता, त्यावेळी त्यांनी जिल यांना उद्देशून असं म्हटलं होतं की- "अरे हो मी हे विसरतेच की तुझ्याकडे फुल टाईम नोकरी सुद्धा आहे".
अनेक वादांना सामोरं जावं लागलं
अमेरिकेची सेकंड लेडी असलेल्या जिल यांचे पती जो बायडन यांच्याशी संबंधित अनेक वाद जोडले गेले. उदाहरणार्थ सन 1991 मध्ये लॉ प्रोफेसर अनिता हिल यांनी सुप्रीम कोर्टाच्या नॉमिनीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला होता. त्यावेळी जो बायडन हे सिनेट ज्युडीशरी कमिटीचे प्रमुख होते. त्यांच्यावर असा आरोप केला जात होता की त्यांनी या खटल्याची सुनावणी योग्यप्रकारे केली नाही याबद्दल जिलना विचारलं त्यावेळी त्यांनी असं उत्तर दिलं की ही आता पुढे जाण्याची वेळ आहे. आणि त्यांनी तो विषय टाळला.
इतकेच नाही तर काही महिलांनी जोवर देखील विनयभंगाचा थेट आरोप केला यावरही जिलचा प्रतिसाद अस्पष्ट होता. त्यांनी आपल्या 'Where the light Enters' या पुस्तकात या गोष्टीचा उल्लेख करताना 'माझा नवरा खूपच चांगल्या कुटुंबातून आहे' असं म्हटलं आहे.