US Election 2020 : ट्रम्प-बायडनची लढतीत श्वान चर्चेत; 13 हजार मतांनी मारली बाजी

US Election 2020 : ट्रम्प-बायडनची लढतीत श्वान चर्चेत; 13 हजार मतांनी मारली बाजी

विल्बर बीस्ट नवीन महापौर असणार आहेत 22, 985 पैकी 13, 143 मतांनी विल्बर या श्वानानं विजय मिळवल्याची माहिती या पोस्टमध्ये देण्यात आली आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 05 ऑक्टोबर : अमेरिकेत नुकत्याच राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडल्या आणि मतमोजणी सुरू आहे. जो बायडन विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली असून आता अंतिम निकाल येणं बाकी आहे. जगभरात सर्वाचं लक्ष या निकालाकडे लागलं असतानाच चर्चा आहे ती अमेरिकतल्या श्वानाची. याचं कारणही तितकंच खास आहे. या श्वानानं चक्क निवडणूक जिंकली आहे.

अमेरिकेतील एका छोट्या शहरात महापौरासाठी निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीला एक श्वान उमेदवार म्हणून उभा राहिला होता. विल्बर बीस्ट असं या श्वानाचं नाव. रॅबिट हॅश नावाच्या एका छोट्या समुदायानं या श्वानाला मोठ्या मताधिक्यानं विजयी केलं आहे. फॉक्स न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार केंटकीमधील रॅबी हॅशच्या छोट्या समुदायाने फ्रेंच बुलडॉगला आपला नवीन नेता म्हणून निवडले. रॅबी हॅश हिस्टोरिकल सोसायटीच्या म्हणण्यानुसार, विल्बर बीस्टने 13,143 मतांनी निवडणूक जिंकली.

Posted by Rabbit Hash Historical Society on Tuesday, 3 November 2020

हे वाचा-US Election 2020 : बायडन यांचे झाले 'वेलडन' काम, ट्रम्प यांच्यावर पराभवाचे ढग!

बुधवारी रॅबिट हॅश हिस्टोरिकल समूहाच्या लोकांनी याबाबत फेसबुक पोस्ट करून माहिती दिली आहे. महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत चार पायी महापौराची निवड करण्यात आली आहे. विल्बर बीस्ट नवीन महापौर असणार आहेत 22, 985 पैकी 13, 143 मतांनी विल्बर या श्वानानं विजय मिळवल्याची माहिती या पोस्टमध्ये देण्यात आली आहे.

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाचा निकाल अगदी शिगेला पोहोचला असताना या श्वानाची चर्चा रंगली आहे. एकीकडे राष्ट्राध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू झाली असताना हा वाद न्यायप्रविष्ट झाला आहे. त्यामुळे आज रात्रीपर्यंत निकाल लागला नाही तर कदाचित महिन्याभरासाठी ही प्रक्रिया रखडली जाण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 5, 2020, 2:51 PM IST
Tags:

ताज्या बातम्या