US Election 2020: दिग्दर्शिका मीरा नायर यांचा मुलगा न्यूयॉर्कमधून विजयी; रॅपर म्हणून आहे ओळख

US Election 2020: दिग्दर्शिका मीरा नायर यांचा मुलगा न्यूयॉर्कमधून विजयी; रॅपर म्हणून आहे ओळख

US Election 2020 : न्यूयॉर्कमधील ऍस्टोरीयामधून त्यांनी बिनविरोध विजय मिळवला आहे. न्यूयॉर्क स्टेट असेम्ब्लीमध्ये निवडून येणारे ते पहिले आशियायी ठरले आहेत.

  • Share this:

न्यूयॉर्क, 4 नोव्हेंबर : अर्थ, वॉटर, फायर अशा चित्रपटांमुळे ओळख निर्माण केलेल्या भारतीय-अमेरिकन फिल्ममेकर मीरा नायर (Meera Nair) यांचा मुलगा जोहरान क्वामे ममदानी (Zohran Kwame Mamdani) अमेरिकन निवडणुकीसाठी रिंगणात होता. न्यूयॉर्क स्टेट असेम्ब्लीमधून तो बिनविरोध निवडून आला आहे. रॅपर म्हणून स्वतंत्र ओळख असणाऱ्या जोहरान ममदानी यांचे वडील युगांडाचे महमूद ममदानी आहेत. चित्रपट दिग्दर्शक मीरा नायर आणि शिक्षक असणारे महमूद ममदानी यांच्या या 29 वर्षीय मुलाने इतिहास रचला आहे. न्यूयॉर्क स्टेट असेम्ब्लीत निवडून येणारा तो पहिला दक्षिण आशियायी प्रतिनिधी ठरला आहे.

मीरा नायर भारतात वादग्रस्त चित्रपट दिग्दर्शिका म्हणूनच ओळखल्या जातात. त्यांचा फायर चित्रपट वादात सापडला होता. नुकताच Netflix वर रीलिज झालेल्या द सूटेबल बॉयच्या निमित्ताने मीरा नायर पुन्हा चर्चेत होत्या. त्यांचा मुलगा जोहरान आता न्यूयॉर्क राज्याच्या असेम्ब्लीवर निवडून आला आहे. न्यूयॉर्कच्या 36 व्या असेम्ब्ली डिस्ट्रिक्टमधून New York's 36th Assembly District in Astoria जोहरान निवडून आले आहेत. ममदानी यांनी ट्विटरवरून आपल्या विजयाची बातमी दिली. ते डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार होते. 'मी श्रीमंत लोकांवर कर भरण्यासाठी दबाव आणण्यासाठी, आजारी लोकांना बरे करण्यासाठी, गोरगरिबांना घरे देण्यासाठी आणि न्यूयॉर्कमध्ये एक उत्तम समाज तयार करण्यासाठी अल्बानीला जात आहे. पण मी हे एकटाच करू शकत नाही. समाजवाद जिंकण्यासाठी आपल्याला बहुजातीय कामगार वर्गाच्या व्यापक चळवळीचीही आवश्यकता असेल. चला एकत्र येऊ आणि @NycDSA मध्ये सामील व्हा.' अशा अर्थाचं ट्वीट त्यांनी केलं.

ममदानी यांचा जन्म युगांडामधील कम्पाला येथे झाला. ते सात वर्षांचे असताना त्यांचं कुटुंब न्यूयॉर्कमध्ये स्थायिक झालं. त्यांनी आपलं शिक्षण बोडॉईन कॉलेजमधून पूर्ण केले. सध्या ते गृहनिर्माण सल्लागार आणि स्थलांतरित झालेल्या नागरिकांना त्यांच्या घरी जाण्यास किंवा त्यांना घर मिळवून देण्यास मदत अशी कामं करीत आहेत.

आपल्या हाऊसिंग काउन्सलर या कामाबद्दल बोलताना ममदानी आपल्या वेबसाइटवर म्हणतो की, “हे एक कठीण काम आहे, परंतु केवळ लोकांपेक्षा नफ्याला महत्त्व देणाऱ्या बँकांशी वाटाघाटी कराव्या लागल्यामुळे किंवा एका प्रकरणात प्रगती होण्यासाठी महिन्यांचा कालावधी लागतो म्हणून अवघड आहे. कारण मी दररोज या सर्व गोष्टींना सामोरा जातो. ज्या गोष्टींशी या व्यक्तींचा कायम सामना होत आला आहे. ऑकटोबर 2019 मध्ये एका मित्राच्या सल्ल्यामुळे त्याने राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने स्थानिक पातळीवरील डेमोक्रॅटिक प्राइमरीमध्ये विद्यमान अरवेल्ला सिमोतास याना 346 मतांनी पराभूत केले.

स्थलांतर हा त्याच्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दा असून प्रतिनिधी म्हणून मी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. ममदानी याने सांगितले न्यूयॉर्क शहरात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित नागरिक राहतात. बरेच वेगवेगळे लोक या ठिकाणी असूनही या शहरात डोनाल्ड ट्रम्प यांची 'हद्दपारी यंत्रणा' कार्यरत आहे.त्यामुळे युनायटेड स्टेट्स इमिग्रेशन अँड कस्टम एन्फोर्समेंट न्यूयॉर्कमधील कोर्टरूम आणि रुग्णालयांपासून या स्थलांतरितांना दूर ठेवणं हे त्यांचे लक्ष्य आहे. त्याचबरोबर न्यूयार्कमधील सर्व स्थलांतरीत नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून देणे आणि न्यूयार्कमधील मध्यमवर्गीयांना उत्तम आरोग्यसेवा देणे देखील त्याचे लक्ष्य आहे. त्याचबरोबर सर्वांसाठी घरे आणि आरोग्य सेवेची हमी देणे ही ममदानीची प्राथमिक उद्दिष्टे आहेत. त्याशिवाय त्याला एनवायपीडी नष्ट करायचं असून आणि 'ब्लॅक अ‍ॅन्ड ब्राउन मध्ये भेद करणाऱ्या वर्णद्वेषी पोलिस यंत्रणेत बदल करणे देखील त्याचे मुख्य लक्ष्य आहे.

स्वत:ला Democratic Socialist म्हणवून घेणारा ममदानी देखील फेमिनिझमचा समर्थक आहे. आणि स्त्रियांना समान हक्क मिळावेत म्हणून देखील प्रयत्न करणार आहे. भांडवलशाहीच्या या जमान्यात स्त्रियांना काम जास्त आणि मोबदला कमी या तत्वाला देखील त्याचा विरोध असून श्रीमंतांना नेहमीच फायदा देणाऱ्या या यंत्रणेमध्ये त्याला बदल करायचा आहे. एकल पेअर सिस्टमद्वारे मानसिक आरोग्य समर्थन, संक्रमण-संबंधित काळजी आणि एचआयव्ही संबंधित लैंगिक आरोग्य-सेवेचा समावेश असणारी क्वेश्चन आणि ट्रान्स-समावेशक वैद्यकीय सेवेची हमी मिळवून देण्याचंदेखील त्याचं लक्ष्य आहे. वोगमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार त्याने मागील वर्षी त्याचा प्रचार सुरु केला होता. त्याला देशी पद्धतीने प्रचार न करण्याचा अनेकांनी सल्ला दिला होता. पण त्याने याकडे दुर्लक्ष करत डेमोक्रॅट पक्षाचे ब्रीदवाक्य ब्रेड आणि रोजेसमध्ये बदल करत रोटी आणि रोजेस असं ब्रीदवाक्य करत आपला प्रचार केला. चालू घडामोडी आणि समाजकारणात त्याचा रस हा त्याची आई दिग्दर्शिका मीरा नायर यांच्यामुळे निर्माण झाल्याचं त्यानी सांगितलं.

2013 मध्ये मीरा नायर यांनी हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना माझ्या मुलाला फिल्म मेकिंगमध्ये कोणताही रस नसून राजकारणात रस असल्याचे म्हटले होते. तो राजकारण, समाजकारण आणि राजकीय गोष्टींमध्ये त्याला अधिक रस असल्याचे त्यांनी म्हटले होते. एकदिवस तो त्याच्या विचारांनी समाजात बदल घडवेल असा विश्वास देखील त्यांनी त्यावेळी व्यक्त केला होता. राजकारणाबरोबरच ममदानी हा रॅपरदेखील आहे. त्याचा नानी नावाचा हा व्हिडिओ आला असून यामध्ये त्याच्याबरोबर 85 वर्षीय अभिनेत्री आणि शेफ मधुर जाफरी झळकली होती. त्याचबरोबर ममदानी याने यामध्ये मिस्टर कार्डमॉम म्हणून काम केले होतं. स्क्रोल डॉट इनला दिलेल्या मुलाखतीत ममदानी याने रॅपर असणं त्याच्यासाठी खूप काही शिकवणारा अनुभव होता असं म्हटलंय. राजकारण आणि संगीत लोकांना वेगळे वाटते. पण माझ्यासाठी हे एकाच असून संगीतामधून आपली कथा सांगता येते. मिस्टर कार्डमॉम म्हणून मी माझ्या आजोबांची कथा सांगितली होती. तसेच उमेदवार म्हणून मी माझ्या समाजाची कथा देखील सांगण्याचा प्रयत्न केल्याचे त्याने म्हटले.

First published: November 4, 2020, 10:59 PM IST

ताज्या बातम्या