अमेरिकेचा अफगाणिस्तानमध्ये सर्वात मोठा बॉम्बहल्ला,आयसिसचे अड्डे लक्ष्य

अमेरिकेचा अफगाणिस्तानमध्ये सर्वात मोठा बॉम्बहल्ला,आयसिसचे अड्डे लक्ष्य

अमेरिकेने या बॉम्बची 2003 मध्ये चाचणी केली होती पण प्रत्यक्ष वापर केला नव्हता. हा बॉम्ब 9 हजार 800 किलो वजनाचा आहे

  • Share this:

अमेय चुंभळे, मुंबई

14 एप्रिल :  अमेरिकेनं इतिहासातला आतापर्यंतचा सर्वात मोठा बॉम्बहल्ला केला आहे. अफगाणिस्तानमध्ये आयसिसच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी हा हल्ला होता. 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याचं समजतंय.

अफगाणिस्तानच्या पूर्व भागातल्या नांगरहारमध्ये अमेरिकेनं काल मदर ऑफ ऑल बॉम्ब्स टाकला.  जीबीयू-43बी असं या बॉम्बचं नाव. भारतीय वेळेनुसार गुरुवारी रात्री  साडे आठ वाजता हा हल्ला झाला. एमसी 130 या अमेरिकन लढाऊ विमानातून हा बॉम्ब टाकण्यात आला. डोंगराळ भागात बोगदे करून आणि गुहांमध्ये राहणाऱ्या आयसिसच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी हा हल्ला होता. हा अणुबॉम्ब नसला तरी अणुबॉम्ब एवढंच नुकसान करण्याची क्षमता याच्यात आहे. फक्त नंतर किरणोत्सर्ग होत नाही, एवढंच. हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सैन्याबाबत मला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

पण हा हल्ला फक्त आयसिससाठी नव्हता. रशिया, हडेलहप्पी उत्तर कोरिया, सीरिया आणि चीनसाठी यामध्ये मोठे सिग्नल होते. सिग्नल हा की ट्रम्प यांचं प्रशासन ओबामांसारखं संयमी आणि शांत नाही. मी निर्णय घेतो, आणि बंडखोर राष्ट्रांवर कारवाई करत रहायला मी मागे पुढे बघणार नाही, हा त्याचा अर्थ. गेल्याच आठवड्यात ट्रम्प यांनी सीरियावर टॉमहॉक मिसाईलनं हल्ले केले. पण हे असंच चालू राहिलं तर याचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारच. तेलाचं मार्केट आतापासूनच हादरू लागलं आहे.

शीतयुद्धाचा काळ पुन्हा येऊ नये, अशी अपेक्षाच आपण भारतात बसून करू शकतो. शेवटी, अमेरिका हा जगाचा दादा आहे. तो करेल ते भगत रहावं लागतं. त्याला पर्याय नाही. आता आयसिसविरोधात ट्रम्प यांचं पुढचं पाऊल काय, ते पाहायचं.

जीबीयू-43बी बॉम्बची काही वैशिष्ट्ये :

- 10 हजार किलो वजन

- बॉम्बमध्ये 8,164 किलो स्फोटकं

- दीड किमीचा परिसर बेचिराख

- छोट्या अणुहल्ल्याइतका परिणाम

- स्फोटकामध्ये आरडीएक्स, टीएनटी आणि अॅल्युमिनियमची पावडर

- जीपीएस गाइडेड असलेला पहिला बॉम्ब

- मॅसिव्ह ऑर्डिनन्स एअर ब्लास्ट अशीही ओळख

- 2003 साली अमेरिकेनं बॉम्ब तयार केला

First published: April 14, 2017, 12:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading