S M L

मोदी-ट्रम्प भेटीआधी हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित

अमेरिकेनं हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलंय. या निर्णयामुळे पाकमधील दहशतवाद्यांना मोठा हादरा मानला जात आहे.

Sachin Salve | Updated On: Jun 26, 2017 11:45 PM IST

मोदी-ट्रम्प भेटीआधी हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित

26 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असून ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहे. मात्र, या भेटीआधी अमेरिकेनं हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलंय. या निर्णयामुळे पाकमधील दहशतवाद्यांना मोठा हादरा मानला जात आहे.

पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची आज भेट होणार आहे. एवढंच नाहीतर दोन्ही नेते एकत्र डिनर करणार आहे. पंतप्रधान मोदी हे पहिले नेते ठरले आहे जे डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आणि व्हाईट व्हाऊसमध्ये डिनर करणार आहेत.

ट्रम्प यांच्या भेटीआधी पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांची भेट घेतली.पाकमध्ये दडून बसलेल्या हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीनवर अमेरिकेनं चांगलाच दणका दिलाय. सय्यद सलाहुद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलंय. भारताने आजपर्यंत नेहमी दहशतवादाविरोधात लढण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन सर्व राष्ट्रांना केलं होतं. अमेरिकेनं सय्यदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करून भारताच्या या लढ्याला एकाप्रकारे मोठी पाठराखण केलीये.

कोण आहे  सय्यद सलाहुद्दीन ?

- सय्यद हा युसूफ शहा नावाने ओळखला जायचा

Loading...

- 1987 ला काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवली

- सलाहुद्दीन पाकिस्तानच्या युनायटेड जिहादचा म्होरक्या होता

- त्यामुळे त्याला तुरुंगात टाकण्यात आलं

- त्यानंतर त्याने  युसूफ शहा नाव बदलून सय्यद सलाहुद्दीन केलं

 सय्यद सलाहुद्दीन हा काश्मीरचा रहिवासी

- पाककडून मिळणाऱ्या मदतीवर भारतात दहशतवादी कृत्य घडवतो

- भारतात अनेक दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी

- पठाणकोट एअरबेसवर हल्यामागे याच्याच  युनायटेड जिहाद काऊंसिलला हात होता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 26, 2017 11:28 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close