Home /News /videsh /

एलियनसोबत संबंधानंतर महिला गरोदर राहिल्याचा दावा; अमेरिकन संरक्षण मंत्रालयाच्या अहवालात धक्कादायक खुलासा

एलियनसोबत संबंधानंतर महिला गरोदर राहिल्याचा दावा; अमेरिकन संरक्षण मंत्रालयाच्या अहवालात धक्कादायक खुलासा

एका महिलेनं आता अतिशय अजब दावा केला आहे. एका एलियनला भेटल्यानंतर ती गरोदर राहिल्याचं महिलेचं म्हणणं आहे (Woman got Pregnant after Sexual Encounter with Alien)

    वॉशिंग्टन 08 एप्रिल : 'एलियन्स' (Aliens) एक रहस्य आहे ज्यामध्ये जवळजवळ प्रत्येक माणसाला रस आहे आणि शास्त्रज्ञ सतत त्यांचा शोध घेत आहेत. परंतु सर्व दावे आणि अनेक कथित व्हिडिओंनंतरही पुराव्यांअभावी एलियन्स हे आजही एक गूढच आहेत. आजवर 'दुसऱ्या ग्रहावरील प्राणी' आणि UFO बद्दल अनेक आश्चर्यकारक दावे करण्यात आले आहेत. परंतु एका महिलेनं आता अतिशय अजब दावा केला आहे. एका एलियनला भेटल्यानंतर ती गरोदर राहिल्याचं महिलेचं म्हणणं आहे (Woman got Pregnant after Sexual Encounter with Alien) विमानतळावर Emergency Landing करताच विमानाचे झाले 2 तुकडे; धडकी भरवणारा LIVE VIDEO 'Anomalous Acute And Subacute Field Effects on Human and Biological Tissues' नावाच्या शीर्षकाच्या अहवालात यूएस संरक्षण मंत्रालयाने 'अलौकिक अनुभव' असल्याचा दावा करणाऱ्या लोकांच्या आरोग्याची तपासणी केली. यातील काही प्रकरणं अतिशय साधी, काही अतिशय विचित्र तर एक केस 'गूढ गर्भधारणा'ची होती. अहवालात एलियन किंवा यूएफओ जवळ आल्यावर दिसणाऱ्या प्रभावांची सूची समाविष्ट आहे. यामध्ये दुखापतीपासून ते अपहरण आणि 'सेक्स' तसंच 'मृत्यू'चीही पाच प्रकरणे आहेत. यादीत सहभागी इतर अनुभवांमध्ये वाईट स्वप्न, आवाज अचानक बंद होणं, डोळ्यांना दुखापत, श्वास घेण्यास त्रास आणि वजन कमी होणे यांचा समावेश आहे. डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी (DIA) कडून मिळालेल्या दस्तऐवजाचा हवाला देत द सनने हे निकाल प्रकाशित केले आहेत. अहवालानुसार, यामध्ये सरकारद्वारे तयार करण्यात आलेले वैज्ञानिक अहवाल आणि UFO प्रोग्रामशी संबंधित पेंटागॉनच्या पत्रांचा समावेश आहे. भारतात अति-गरिबी संपली आहे का? IMF अहवालातील संकेत, जाणून घ्या अधिक माहिती अहवालानुसार, 'बाहेरील विमानांशी संपर्क झाल्यामुळे' अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी ४२ प्रकरणे मेडिकल फाईलची आहेत आणि ३०० प्रकरणे 'अप्रकाशित' आहेत, ज्यात माणसं जखमी झाली आहेत. निकालाशी संबंधित कागदपत्रे सार्वजनिक झाल्यानंतर सोशल मीडियावर काहींनी त्याची खिल्ली उडवली. ट्विटरवर एका युजरने लिहिलं की, 'माझ्या मोठ्या पोटाचा अर्थ असा नाही की मी लठ्ठ आहे, तर मी रहस्यमयपणे गर्भवती आहे.'
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Aliens, Pregnant woman

    पुढील बातम्या