Home /News /videsh /

अमेरिका करणार अफगाणिस्तानला मदत, देणार तब्बल 6.4 कोटी डॉलर

अमेरिका करणार अफगाणिस्तानला मदत, देणार तब्बल 6.4 कोटी डॉलर

जागतिक महासत्ता अमेरिकेनं (America) अफगाणिस्तानला (Afghanistan) 6 कोटी 40 लाख रुपयांची मदत (Aid) करण्याची घोषणा केली आहे.

    न्यूयॉर्क, 13 सप्टेंबर : जागतिक महासत्ता अमेरिकेनं (America) अफगाणिस्तानला (Afghanistan) 6 कोटी 40 लाख रुपयांची मदत (Aid) करण्याची घोषणा केली आहे. तालिबान सरकारला अमेरिकेनं अद्याप अधिकृत मान्यता दिलेली नसली, तरी मानवतेच्या आधारावर अफगाणिस्तानमधील नागरिकांसाठी ही मदत करत असल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं आहे. मानवतेच्या आधारावर मदत अमेरिकेनं अफगाणिस्तानमधून माघार घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची परिस्थिती बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती असून नागरिकांच्या मूलभूत गरजादेखील भागत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे सर्वसामान्य अफगाणी नागरिकांच्या मदतीसाठी आर्थिक मदत करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. अमेरिकेकडून अफगाणिस्तानला 64 मिलियन डॉलर म्हणजेच 6 कोटी 40 लाख अमेरिकी डॉलर पाठवले जाणार आहेत. चीनच्या दुप्पट मदत अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार प्रस्थापित झाल्यानंतर चीननं त्याला मान्यता दिली असून मदतदेखील जाहीर केली होती. चीननं सर्वप्रथम 200 मिलियन युआन म्हणजेच सुमारे 3 कोटी 10 लाख अमेरिकेन डॉलरची मदत जाहीर केली होती. त्यानंतर आता  अमेरिकेनं 6 कोटी 40 लाख डॉलरची मदत जाहीर केली आहे. हा आकडा चीनने जाहीर केलेल्या निधीच्या दुपटीपेक्षा अधिक आहे. अधिक मदतीचं आवाहन प्राथमिक स्वरुपात ही मदत पाठवण्यात येत असून प्रत्यक्ष अफगाणिस्तानमधील परिस्थितीचा आढावा घेऊन अधिक मदत करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असं अमेरिकेचे राजदूत लिंडा थॉम्पसन ग्रीनफिल्ड यांनी म्हटलं आहे. आपण जगातील इतर देशांनाही मदत करण्याचं आवाहन करत असून बिकट परिस्थितीत अफगाणिस्तानातील नागरिकांच्या पाठिशी उभं राहण्याचं आवाहन केलं आहे. हे वाचा - खास महिलांसाठी LIC 'ही' पॉलिसी, जी देते लाखोंचा लाभ तालिबानला आवाहन अफगाणिस्तानातील गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचवता यावी,यासाठी तालिबान सरकारनं सहकार्य करावं, अशी विनंती तालिबान सरकारला करण्यात आलं आहे. अमेरिकी सैन्यानं अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर तिथली परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Afghanistan, America, Taliban

    पुढील बातम्या