मराठी बातम्या /बातम्या /विदेश /US Capitol Lockdown : US Capitol जवळ गोळीबार, सुरक्षेसाठी लॉकडाऊनची घोषणा

US Capitol Lockdown : US Capitol जवळ गोळीबार, सुरक्षेसाठी लॉकडाऊनची घोषणा

US Capitol जवळ (अमेरिकी संसद) गोळीबार झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

US Capitol जवळ (अमेरिकी संसद) गोळीबार झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

US Capitol जवळ (अमेरिकी संसद) गोळीबार झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

वॉशिंग्टन, 2 एप्रिल : US Capitol जवळ (अमेरिकी संसद) गोळीबार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेत US Capitol मधील दोन सुरक्षा कर्मचारी आणि एक व्यक्ती जखमी झाले आहेत. पोलिसांनी अद्याप याबाबत पुष्टी केलेली नाही. गोळीबारानंतर US Capitol मधील सुरक्षेसाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. US Capitol च्या पोलिसांचं म्हणणं आहे की, सर्व कॅपिटल बिल्डिंगना बाहेरील धोक्यानंतर लॉकडाऊनची घोषणा केली आहे आणि कर्मचाऱ्यांनाही इमारतीच्या बाहेर वा आत येऊ नये, असं आवाहन केलं आहे. याशिवाय सर्व गेटदेखील बंद करण्यात आले आहेत. ( Shooting near US Capitol security lockdown announced)

मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा बॅरिकेडिंगला उडवित अज्ञातांनी दोन पोलीस अधिकाऱ्यांना टक्कर मारली. हे आरोपी पोलीस गोळीबारात जखमी झाले आहेत आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. एका जखमी अधिकाऱ्याला तातडीने कारमधून रुग्णालयात नेण्यात आलं , तर दुसऱ्या अधिकाऱ्याला आपात्कालिन मेडिकल क्रूने रुग्णालयात पोहोचवलं. याशिवाय आरोपीलादेखील रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

हे ही वाचा-बंदीला चॅलेंज! डोनाल्ड ट्रम्प सुरू करणार स्वत:ची सोशल मीडिया साईट

एका अज्ञात गाडीने दोन पोलीस अधिकाऱ्यांना धडक दिली होती. या घटनेनंतर सुरक्षेसाठी परिसरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनाक्रमात कॅपिटल परिसरात हेलिकॉप्टर लँड झाल्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही व्हिडिओमध्ये कॅपिटलमध्ये मोठी प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले आहे आणि जखमींना घेऊन जाण्यासाठी स्ट्रेचर आणण्यात आलं आहे.

First published: