S M L

अमेरिकेने पाकिस्तानला दिली जाणारी १६२८ कोटींची आर्थिक मदत थांबवली

अमेरिकेने पाकिस्तानला दिली जाणारी आर्थिक मदत थांबवली. अमेरिकेने १६२८ कोटींची मदत थांबवली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या कालच्या वक्तव्यानंतर अमेरिकेने कारवाई केली.

Sonali Deshpande | Updated On: Jan 2, 2018 10:46 AM IST

अमेरिकेने पाकिस्तानला दिली जाणारी  १६२८ कोटींची आर्थिक मदत थांबवली

02 जानेवारी : अमेरिकेने पाकिस्तानला दिली जाणारी आर्थिक मदत थांबवली. अमेरिकेने १६२८ कोटींची मदत थांबवली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या कालच्या वक्तव्यानंतर अमेरिकेने कारवाई केली.

पाकिस्तान दहशतवादाला थारा देत असल्यानं अमेरिकेने ही कारवाई केलीय. 'पाकिस्तानला आम्ही आत्तापर्यंत विविध पद्धतीने ३३ अब्ज डॉलर्सची मदत केली. पण आम्हीच मूर्ख ठरलो. पाकिस्तानने आम्हाला धोका दिला. कारण आम्ही ज्या खतरनाक दहशतवाद्यांना अफगाणिस्थानमध्ये शोधत होतो, अशा दहशतवाद्यांना पाकिस्तानने आश्रय दिला,' असा थेट आरोपही ट्रम्प यांनी केला आहे.

दहशतवादी कारवाया रोखण्यात पाकिस्तानला अपयश आल्यास पाकिस्तानची मदत थांबवली जाऊ शकते असं अमेरिकेने आधीच सूचित केलं होतं.या वर्षात पाकिस्तानला अमेरिकेडून २५५ कोटी डॉलर्सची मदत मिळणार होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 2, 2018 10:46 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close